IMPIMP

Eknath Khadse | ‘भाजपच्याच नेत्यांचा दहशतवाद्यांशी संबंध’; नाथाभाऊंनी सांगितलं भाजपला फंड देणाऱ्या ‘त्या’ दहशतवाद्याचं नाव!

by nagesh
Eknath Khadse | eknath khadse statement on ed cbi cid acb raid on opposition leaders treat like enemy

सरकारसत्ता ऑनलाइन – Eknath Khadse | भाजप आणि महाविकास आघाडीमधील सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) आरोप- प्रत्यारोप होताना आपण पाहत असतो. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे ED च्या कोठडीत आहेत. मात्र यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. मलिक यांचे दाऊदसोबत संबंध असल्याची टीका भाजपचे नेते करत आहेत. मात्र अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. नाथाभाऊंनी थेट भाजपला फंड पुरवणाऱ्या एका दहशतवाद्याचं नाव सांगितलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपने नवाब मलिकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. मात्र भाजपला इक्बाल मिरचीने फंड पुरवला होता. इक्बाल मिरची (Iqbal Mirchi) हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. त्यासोबतच भाजप नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये (Nashik) दाऊदच्या नातेवाईकासोबत जेवण केलं म्हणजे त्यांचा दाऊदच्या नातेवाईकासोबत संबंध आहेत असं म्हणता येईल का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

इक्बाल मिरचीकडून तुम्ही पक्षासाठी फंड (Fund) घेता आणि या ठिकाणी व्यवहार झाला म्हणून बोलता हे काय आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून (BJP) काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse serious allegations that bjp links with terrorists

हे देखील वाचा :

PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan | पंतप्रधान महापालिका भवनमध्ये येणार पण ‘या’ कारणामुळं सत्ताधारी भाजपसह अनेक नगरसेवकांचा ‘हिरमोड’

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेचा ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ उपक्रम

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts