IMPIMP

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp to table no confidence motion against thackeray government movements continue after court decision

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोड घडताना दिसत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. असं असतानाच आता भाजपकडून (BJP) एक मोठी ऑफर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपने दिलेल्या ऑफरची चर्चा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे असं झालं तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे अशी निवड असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाबरोबर 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची माहिती आहे. तसेच सध्या शिंदे गटात 6 मंत्री आहेत. त्यामुळे यांना नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळाणार असल्याची शक्यता आहे.

काल फेसबूकद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) आव्हानानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, असं आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केलं आहे. मागील अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Web Title :- Eknath Shinde | bjp offers deputy chief minister post to rebel eknath shinde group

हे देखील वाचा :

Eknath Shinde | विधीमंडळ पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेच कायम; 34 आमदारांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र?

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा

Related Posts