IMPIMP

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

by nagesh
 Eknath Shinde Cabinet | swearing in ceremony of the eknath shinde cabinet likely to held on 4th or 5th july

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनEknath Shinde Cabinet | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. दोघांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा (Eknath Shinde Cabinet) शपथविधी चार किंवा पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजपकडून (BJP) नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजतेय.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांचा नव्या मंत्रिमंडळात (Eknath Shinde) समावेश होणार नसल्याचे बोलले जात आहे. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jayakumar Rawal), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) यांच्या नावाची चर्चा आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उदय सामंत (Uday Samant),
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
यांच्यासह संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), बच्चू कडू (Bacchu Kadu)
यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title :- Eknath Shinde Cabinet | swearing in ceremony of the eknath shinde cabinet likely to held on 4th or 5th july

हे देखील वाचा :

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

Related Posts