IMPIMP

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp and shiv sena government to be formed in the maharashtra this is the strategy of the shinde group maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | राज्याचं वातावरण गेल्या तीन दिवसांपासून अगदी ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं (Mahavikas Aghadi Government) काय होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या आगामी रणनीती आखण्यात येतील,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “जी काही मॅजिक फिगर लागते त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. राज्यपालांना पत्र पाठवण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.” तसेच, ”आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर आहे. पवारांच्या इशाऱ्याला आम्ही घाबरत नाहीत. लोकशाहीमध्ये असा दबाव काम करत नाही. कायद्याला महत्त्व आहे. आमच्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. एक नोटिस काय १० नोटिसा आल्या तरी भीक घालत नाही. तुम्ही मायनॉरिटी मध्ये आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्याचा काही अधिकार नाही.”

दरम्यान, “आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिंदे गट आता निर्णय काय घेणार? आणि महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? याचीच चर्चा राज्यासह देशभर पसरली आहे.

Web Title :- Eknath Shinde | eknath shinde claims support of 50 shivsena mlas in guwahati

हे देखील वाचा :

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत काहीसा बदल; जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

Related Posts