IMPIMP

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच निर्णय…’

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गटनेता (Group Leader) म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर (Goa Airport) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबईसाठी रवाना झाले आहे. ते मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. गोवा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे राजीनामा (Uddhav Thackeray Resigns) दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गोव्यात बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड झाली असल्याचे सांगितले. सरकार स्थापनेसंदर्भात पुढील प्रक्रियेसाठी सर्व 50 आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंबंधी विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, त्याचा आम्हाला आनंद नाही.
जी परिस्थिती उद्भवली होती त्यात सर्व 50 आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न,
अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते.
त्यावेळी आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा (Hindutva) विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे.

Web Title :- Eknath Shinde | eknath shinde leaves for mumbai for goa to meet maharashtra governor bhagat singh koshyari maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

PAN-Aadhaar Linking Penalty Rule | पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय का ?; आजच करा ‘हे’ काम, अन्यथा बसेल 1000 रुपयांचा दंड

Related Posts