IMPIMP

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

by nagesh
Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary), प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस देण्यात आली. या सुनावणीत शिंदे गटातील आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचं नाव घेत त्यांचाच हा विजय असल्याचं म्हटलं आहे. “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!” असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसीनंतर सदस्यांना उत्तर द्यायला 14 दिवसांचा वेळ द्यायला हवा होता, पण केवळ 48 तास दिले गेले.
त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी शिंदे गटाचे वकील नीरज कौल (Lawyer Neeraj Kaul) यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
दरम्यान यानंतर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 12 जूलै पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
यानंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा जोर धरत आहेत.

Web Title :- Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

हे देखील वाचा :

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

Maharashtra Political Crisis | कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग ! ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार?

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

Related Posts