IMPIMP

Eknath Shinde | भाजप नव्हे ! एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ महाशक्तीचा केला खुलासा; म्हणाले…

by nagesh
Deepak Kesarkar | it is illegal to remove eknath shinde from the post of shiv sena leader say deepak kesarkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. जे बहुमत आवश्यक होतं ते आम्हाला मिळालं आहे. सर्वजण आमच्या सोबत आहेत. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. आज सर्व आमदारांची बैठक होणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काल रेडिसन ब्लू हॉटेलमधला एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांना संबोधित करत होते. त्यावेळी एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना त्या महाशक्ती संदर्भात शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “आमच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांची महाशक्ती असून त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे,” त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “सर्व आमदारांची आज बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय घेतले जाणार आहेत. अल्पमतात असलेल्या गटाला आमदारांचे निलंबन करण्याचा अधिकार नाही. बैठकीला उपस्थित राहिलो नाही म्हणून आमदारकी रद्द केली तर देशातील हे पहिले उदाहरण ठरेल. सर्व गोष्टी या कायद्यानुसार चालत असतात. लोकशाहीत आकडे आणि संख्याबळ महत्त्वाचे असते.”

शरद पवारांनी केलेल्या विधानालाही दिलं उत्तर –
राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते
की, “जे आमदार राज्याबाहेर गेले आहेत. त्यांना कधी ना कधी मुंबईत यावेच लागेल. राज्यपालांची भेट घ्यावी लागेल.
विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावेच लागेल. त्यामुळे त्या आमदारांना इथं येऊ द्या,” असे ते म्हणाले होते.
त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो.
पण लोकशाहीत नंबर महत्त्वाचे असतात. कायद्याप्रमाणे जे काही असत तेच करावं लागतं. नियमाप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे.”

Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde says balasaheb thackeray and anand dighe superpower with us

हे देखील वाचा :

Pune Crime | पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसुत्र लांबविले

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

Related Posts