IMPIMP

Eknath Shinde vs Ajit Pawar | विरोधकांची शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी; म्हणाले – ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके…‘

by nagesh
 Eknath Shinde vs Ajit Pawar | NCP leader ajit pawar opposition party leaders trolls eknath shinde shiv sena rebel mlas also slams devendra fadnavis bjp for ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde vs Ajit Pawar | ‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…‘ अशी
घोषणाबाजी आज विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर उभे राहून करत एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस
होता, आणि आजही विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. भाजपाच्या मदतीने शिवसेनेत बंडखोरी करून सत्तांतर घडवून आणणार्‍या शिंदे गटातील
प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. आजही हाच आरोप करत विरोधकांनी शिंदे गटाला टार्गेट केले. (Eknath Shinde vs Ajit Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन (Monsoon session) वादळी ठरले असून पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला सळो की पळो करून ठेवले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…‘, तसेच, ‘पन्नास खोके, एकदम ओके… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले…‘, अशा घोषणा दिल्या. ‘ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय…‘, अशा घोषणा देत भाजपावर सुद्धा निशाणा साधला.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title :- Eknath Shinde vs Ajit Pawar | NCP leader ajit pawar opposition party leaders trolls eknath shinde shiv sena rebel mlas also slams devendra fadnavis bjp for ed

हे देखील वाचा :

Minor Girl Gang Rape in Pune | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढत नेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

OBC Political Reservation In Maharashtra | 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले ‘हे’ निर्देश

Ajit Pawar | सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

Related Posts