IMPIMP

Eknath Shinde Vs Shivsena In Supreme Court | कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादामुळे शिंदे गटाची कोंडी! एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊच शकत नाहीत

by nagesh
Eknath Shinde Vs Shivsena In Supreme Court | eknath shinde vs shivsena in supreme court big twist eknath shinde cannot go to election commission kapil sibal put his finger

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Eknath Shinde Vs Shivsena In Supreme Court | शिवसेना आणि शिंदे गटातील (Shinde Group) वादावर आज 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून (Election Commission) युक्तीवाद झाला. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे. सिब्बल यांनी शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, याकडे लक्ष वेधले. (Eknath Shinde Vs Shivsena In Supreme Court)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 2018 ते 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत, असे कागदपत्र उपलब्ध आहेत. परंतू, खरी शिवसेना आपलीच असे सांगणार्‍या एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे साधे प्राथमिक सदस्यत्व सुद्धा नाही. शिंदेंनी स्वत:हून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले होते. ते निवडून आलेले नाहीत तर नामनिर्देशीत सदस्य होते, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. यामुळे शिंदे गट अडचणीत असल्याचे भासत आहे.

सिब्बल म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी 19 जुलैपूर्वीच सदस्यत्व सोडले होते. निवडणूक आयोग त्यानंतर झालेल्या गोष्टींकडे पाहत आहे. परंतू त्यापूर्वीच्या गोष्टी कशा दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात.

सिब्बल म्हणाले, शिंदे यांनी पक्षाची फसवणूक केली आणि विरोधी पक्षाशी युती केली. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. यामुळे शिंदेंचे विधानसभेतील सदस्यत्व देखील अपात्र ठरते.

शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Advocate Abhishek Manu Singhvi) यांनी म्हटले
की, एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो.
एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने धनुष्यबाण हे चिन्ह मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असा प्रश्न विचारला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) यांनी बाजू मांडताना म्हटले
की, 19 जुलैच्या स्थितीनुसार कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल. विलीनकरण हा एकमेव मुद्दा आहे.
तर कोर्टाने म्हटले की, त्यात अपात्रतेचा मुद्दा विधिमंडळाचा आहे. आयोगाला राजकीय पक्षाबाबत निर्णय घ्यायचा आहे.

न्यायालयाने प्रश्न विचारला की, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार म्हणून की सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले आहेत,
धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची मागणी करत आहेत.

न्यायालयाच्या या प्रश्नावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनीही तोच प्रश्न उपस्थित केला.
त्यावर, एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात,
असेही खंडपीठाने म्हटले. यावर सिब्बल यांनी युक्तीवाद केला की, शिंदे हे पक्षाचे सदस्यच नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Eknath Shinde Vs Shivsena In Supreme Court | eknath shinde vs shivsena in supreme court big twist eknath shinde cannot go to election commission kapil sibal put his finger

हे देखील वाचा :

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…

Uddhav Thackeray On Amit Shah | उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले – कितीही अफजल खान आले तरी…

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Related Posts