IMPIMP

Elon Musk | एलन मस्‍क आता X यूजर्सकडून या सेवेसाठी सुद्धा घेणार पैसे, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मिळते FREE

by sachinsitapure

नवी दिल्ली : Elon Musk | ट्विटर खरेदी करून त्याचे नाव बदलून एक्स करणारे एलन मस्‍क दररोज या सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्ममध्ये काही ना काही बदल करत आहेत. आधीपासून ते अनेक फीचरसाठी पैसे वसूल करत आहेत. आता X लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी (Live Streaming) सुद्धा यूजर्सकडून पैसे घेणार आहे.

एक्‍सने म्हटले की, लाईव्ह स्ट्रीमिंग सुविधा लवकरच केवळ प्रीमियम सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध असेल. म्हणजे, सामान्य यूजर्स एक्सवर लाईव स्ट्रीमिंग करू शकणार नाहीत. हा बदल कधी लागू होईल, याबाबत सध्या तरी एक्स ने कोणतीही डेडलाईन सांगितलेली नाही. फेसबुक आणि इन्स्‍टाग्रामवर लाईव स्ट्रीमिंग फ्री आहे.

एक्‍स पर अधिकृत @live हँडलवर यास दुजोरा दिला आहे. एका पोस्‍टमध्ये म्हटले आहे की, लवकरच, केवळ प्रीमियम ग्राहकच एक्सवर लाईव स्‍ट्रीम करू शकतील. यामध्ये एक्स इंटीग्रेशन एनकोडरद्वारे लाईव्हा होण्याचा समावेश आहे.

लाईव्ह राहणे सुरू ठेवण्यासाठी प्रीमियममध्ये अपग्रेड करा. म्हणजे लाईव्ह स्ट्रीम सुरू करण्यासाठी लवकरच यूजर्सकडे प्रीमियम सब्सक्रिप्शन असणे आवश्यक होईल. भारतात प्रीमियम सब्सक्रिप्शनचा दर ५६६.६७ रुपये प्रती महिना आहे.

Related Posts