IMPIMP

Enforcement Directorate (ED) | काँग्रेसचा वरिष्ठ नेता ईडीच्या रडारवर; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

by nagesh
ED Inquiry | eds watch on leaders involved in scams strict action instructions

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Enforcement Directorate (ED) | गेल्या काही महिन्यापासून सक्तवसुली संचालनालयाचं (Enforcement Directorate (ED)) महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यात छापेमारीचं सत्र सुरूच आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादीचे (NCP) काही नेते ईडीच्या रडारवर असतानाच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागल्याची माहिती आहे. नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी (National Herald Corruption Case) खर्गे यांची चौकशी होणार असून आज (सोमवार) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2012 साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP Leader Subramaniam Swamy) यांनी हे आरोप केला होता की, काँग्रेस पक्षानं आपल्या पक्षनिधीतून सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कंपनी यंग इंडियाला 90 कोटी रुपये उधार दिले होते. या पैशातून राहुल आणि सोनिया यांच्या कंपनीनं नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमान पत्र चालवणारी कंपनी असोसिएट जनरल खरेदी केली होती. यानंतर या कंपनीची 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती अजुनही गांधी कुटुंबियांकडे आजही असल्याचं सांगितलं जातंय. (Enforcement Directorate (ED)

दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरण (National Herald Corruption Case) सन 1938 मध्ये करण्यात आलेलं एक वर्तमानपत्र होते.
पंडित नेहरु यांनी या वृत्तपत्राचा वापर स्वातंत्र्ययुद्धात केला होता.
नेहरुंनी 1937 साली असेसिएटेड जर्नल बनवलं होतं. ज्यामध्ये 3 वर्तमानपत्रं काढण्यास सुरुवात करण्यात आली.
यात हिंदीत नवजीवन, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड. 2008 साल येईपर्यंत असोसिएट जर्नलने आता वर्तमान पत्र न छापण्याचा निर्णय घेतला. नंतर ही बाब समोर आली की, असोसिएट जर्नलवर 90 कोटी कर्जाचा बोजाही आहे.

Web Title :- Enforcement Directorate (ED) | senior congress leader mallikarjuna kharge summoned by Enforcement Directorate (ED)

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याने शिक्षिकेचा मृत्यू; पोलीस पतीच्या तक्रारीवरून डॉक्टरवर FIR

Weather Update | काही राज्यांना उन्हाचा चटका तर ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; IMD

Pune-Ahmednagar Highway Accident | कारला धडकून लक्झरी बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; कारचालक ठार, 25 प्रवासी जखमी

Related Posts