IMPIMP

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

by pranjalishirish
enforcement directorate ED take big action on sushilkumar shindes daughter son law property attached

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (DHFL) प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushil kumar shinde) यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ईडीने ED जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे.

पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता अंधेरी पूर्व येथील आहेत. 10 हजार 550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता इडीने ED जप्त केल्या आहेत. ईडीने 35.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. प्रीती श्रॉफ या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत.

DHFL अनेक घोटाळ्यात सहभागी

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PMC Bank Scam) दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचे कर्ज फ्रॉड घोषित केले. या कंपनीची YES बँकेमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत आहेत. ईडीने ED त्यांची देखील संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान व धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची मालमत्ता अटॅच केली आहे. यामध्ये राणा कपूर यांची 1 हजार कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डीएचएफएल प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलकडे (NCLT) सोपवलं होतं. DHFL अशी पहिली वित्तीय कंपनी आहे, जी आरबीआयने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकाराचा वापर करत NCLT मध्ये पाठवली होती.

Also Read : 

सचिन वाझे प्रकरण : जयंत पाटलांचे भाजपला चोख प्रत्युत्तर, म्हणाले – ‘गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

Related Posts