IMPIMP

ENG vs PAK 2nd Test | अबरार अहमदने पदार्पणातच रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज

by nagesh
ENG vs PAK 2nd Test | abrar ahmed has become the third bowler of pakistan to take 7 wickets on his test debut

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : ENG vs PAK 2nd Test | सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान या ठिकाणी खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून अबरार अहमदने पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. (ENG vs PAK 2nd Test)

उजव्या हाताच्या लेगस्पिनर अबरार अहमदने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आपल्या कसोटी पदार्पणात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पाकिस्तानचा केवळ 13 वा गोलंदाज ठरला आहे. तसेच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अबरार अहमदच्या अगोदर मोहम्मद झाहिद आणि मोहम्मद नाझीरने पदार्पणात 7 विकेट्स घेतल्या होत्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजच्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
इंग्लंड संघाकडून बेन डकेटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 49 चेंडूत 63 धावा केल्या.
तसेच ओली पोपनेदेखील 61 चेंडूत 60 धावा केल्या. बाकी फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही.
या सामन्यात नवोदित अबरार अहमदने सर्वांना आश्चर्यचकित करत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या तर झाहिदने मेहमूदने 3 विकेट्स घेतल्या.
अबरार अहमदच्या या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला 281 धावांवर रोखण्यात पाकिस्तानला यश आले.

Web Title :- ENG vs PAK 2nd Test | abrar ahmed has become the third bowler of pakistan to take 7 wickets on his test debut

हे देखील वाचा :

Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Related Posts