IMPIMP

कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी! EPFO बोर्डाने पेन्शन योजनेत केले बदल, जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

by nagesh
EPFO Interest Rate | epfo interest credit for 2021 22 delay due to software upgradation

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओ (EPFO) च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टची (सीबीटी CBT) 232 वी बैठक सोमवारी झाली. या बैठकीत सरकारला शिफारस करण्यात आली की, EPS-95 योजनेत काही सुधारणा करून सेवानिवृत्तीच्या जवळ असलेल्या सदस्यांना पेन्शन (Pension) फंडात जमा केलेली रक्कम काढण्यासाठी परवानगी द्यावी. यानंतर ईपीएफओने (EPFO) सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना कर्मचारी पेन्शन योजना (Employee Pension Scheme) 1995 अंतर्गत रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. सध्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संघटना ग्राहकांना सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा शिल्लक असल्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, सीबीटीने सरकारला शिफारस केली आहे की, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईपीएस खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देण्यात यावी. याशिवाय, सीबीटीने 34 वर्षांहून अधिक काळ योजनेचा भाग असलेल्या सदस्यांना समानुपातिक पेन्शन लाभ देण्याची शिफारस केली आहे. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्तीचे लाभ निश्चित करताना अधिक निवृत्ती वेतन मिळण्यास मदत होईल. याशिवाय 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओच्या (EPFO) कामकाजाचा 69 वा वार्षिक अहवाल देखील मंजूर करण्यात आला, जो संसदेत सादर करण्यात येणार आहे.

नोकरदार लोकांना दिलासा देण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 31 ऑक्टोबर रोजी अशा ग्राहकांसाठी ईपीएस- 1995 मधील रक्कम काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला, ज्यांच्याकडे फक्त सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा कालावधी आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या अध्यक्षतेखालील सीबीटीने आपल्या 232 व्या बैठकीत ईपीएस-95 योजनेत काही सुधारणांची शिफारस सरकारला केली. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीचे लाभ निश्चित करताना पेन्शन म्हणून चांगली रक्कम मिळेल.

EPS-95 मधून सूट किंवा सूट रद्द करण्याच्या प्रकरणांमध्ये समान मूल्य हस्तांतरण गणना करण्याची देखील
सीबीटीने शिफारस केली आहे. याशिवाय, एक्सचेंज ट्रेडेड फंड युनिटमधील गुंतवणुकीसाठीही या धोरणाला
मान्यता देण्यात आली आहे. 2022-23 च्या व्याज दराची गणना करण्यासाठी भांडवली नफ्यासाठी कॅलेंडर
वर्ष 2018 कालावधीत खरेदी केलेल्या ईटीएफ युनिट्सचा उत्पन्नात समावेश करण्यास सीबीटीने मान्यता दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  EPFO | epfo withdrawal norms for eps 95 subscribers relaxed

हे देखील वाचा :

Pune Crime | विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाम्पत्याचा राडा

Tulsi Benefits | चमत्कारी आहेत ‘या’ तुळशीचे फायदे, जाणून घ्या कसा करावा वापर

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या मंत्र्याची खोक्यांच्या विषयावर स्पष्ट कबुली, म्हणाले – ‘हम तो है बदनाम, बदनामी हम से डरती है’

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडने ओलांडली असेल बॉर्डर लाईन तर आजच ‘हे’ 5 फूड्स टाळा, अन्यथा वाढू शकते सांधेदुखी

Related Posts