IMPIMP

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि कुटूंबीयांच्या नावे संपत्ती किती? जाणून घ्या

by pranjalishirish
ex commissioner mumbai parambir singh property

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा खळबळजनक आरोप करून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh  यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली होती. अशातच आता परमबीर सिंग यांच्या कोट्यावधींच्या स्थावर मालमत्तेची माहिती समोर आली आहे. दरवर्षी IAS, IPS अधिकाऱ्यांना आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती शासनाला द्यावी लागते. गेल्या वर्षी सरकारला सादर केलेल्या माहितीनुसार, सिंग आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या नावे मुंबईत 4 कोटींचे  दोन फ्लॅट तर हरीयाणातील आपल्या गावी 4 कोटींचे घर व लाखो रुपयांची जमिन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढी कोट्यवधींची संपत्ती केवळ पगारावर कमावणे शक्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेची खरमरीत टीका; ‘भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला विसरत नाहीत’

परमबीर सिंग Parambir Singh  यांनी शासनाला सादर केलेल्या या माहितीनुसार 2003 मध्ये अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत 48.75 लाखांचा फ्लॅट त्यांनी खरेदी केला होता.  त्यानंतर  2005 मध्ये नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटींना आणखी एक फ्लॅट सिंग यांनी आपल्या व पत्नीच्या नावे संयुक्तीकरित्या खरेदी केला होता. तसेच हरीयाणातील त्यांच्या गावी कुटूंबीयांच्या व स्वतःच्या नावे संयुक्तिकरित्या 4 कोटी रुपये किमतीचे घर असल्याची माहितीही सिंग यांनी शासनाला सादर केली आहे. त्यानंतर  2019 मध्ये हरीयाणात 14 लाखांची जमिन खरेदी केली आहे. या सर्व मालमत्ता त्यांनी बाजारभावानुसार खरेदी केल्या असून त्याची किमत 8 ते 10 कोटींच्या घरात जाते. केवळ पगारावर ही कोट्यवधींची संपत्ती कमावणे शक्य आहे का, तसेच या स्थावर मालमत्तेशिवाय सिंग यांच्याकडे आणखी किती व कुठल्या स्वरुपात संपत्ती आहे, याचीही चौकशी करावी, अशी मागणी सत्ताधा-यांकडून होत आहे.

Also Read : 

छगन भुजबळांचं थेट रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन, म्हणाले – ‘…अन्यथा LockDown शिवाय कुठलाही पर्याय नाही’

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts