IMPIMP

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे

by nagesh
PM Narendra Modi | do not step on peoples earning prime minister narendra modis appeal states

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Farm Laws | गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता मोठे यश आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला (Repeal All 3 Farm Laws). देशवासीयांना संबोधित करताना मोदीं यांनी हा निर्णय घोषित केला आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्या घरी जावे. शेतात जाऊन काम सुरु करावे. एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी केले आहे.

गेल्या ७ वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथमच अशा प्रकारे एकदा घेतलेला निर्णय बदलला आहे. पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसल्यानंतर मोदी
सरकारने (Modi Government) पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर मागे घेतला होता. त्यानंतर आता पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका लक्षात
घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
शेतकर्‍यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला होता. आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर टिकून राहिल्यानंतर मोदी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

Web Title: Farm Laws |pm narendra modi announces repeal all 3 farm laws farmer protest modi governmen

हे देखील वाचा :

MSME साठी मिळू शकते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, SIDBI ने केला Google सोबत करार; जाणून घ्या कसा अन् कोणाला होणार फायदा

IPS Vidya Kulkarni | वरिष्ठ आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी, नवल बजाज यांची CBI च्या सह संचालकपदी नियुक्ती

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Related Posts