IMPIMP

FB-WhatsApp Technical Error | FB-WhatsApp पुन्हा ‘गंडलं’ तर? जाणून घ्या ‘हे’ 5 सर्वोत्तम पर्याय अन् राहा जागाच्या संपर्कात

by nagesh
FB-WhatsApp Technical Error | facebook outage these are some whatsapp alternatives so that communication is never down try Signal, Telegram, Discord, Microsoft Teams and iMessages

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था सोमवारी (दि.4) रात्री 9.15 पासून मंगळवार (दि.5) पहाटे चार वाजेपर्यंत फेसबुकचे सर्व्हर डाऊन (Facebook server down) झाले होते. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम (Instagram) या समाज माध्यमांवर कोणत्याही संदेशवाहनाची (FB-WhatsApp Technical Error) देवाणघेवाण होऊ शकली नाही. जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स एवढचं नाही तर कार्यालयीन कामकाजावर याचा परिणाम झाला. अनेकांसाठी जगाशी संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जर भविष्यात अशी परिस्थिती (FB-WhatsApp Technical Error) निर्माण झाली तर तुमचा कुणाशीही संवाद तुटू नये यासाठी काही पर्याय उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाशी किंवा कामासंदर्भातील व्यक्तीशी संवाद साधू शकता. जाणून घ्या काय आहेत पर्याय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तुम्ही जर हे इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप (Instant messaging app) वापरले तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीशी, कुटुंबाशी संपर्क ठेऊ शकता.
अर्थात फेसबुकच्या मालकीचे असणारे कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप बंद (FB-WhatsApp Technical Error)
झाले तर तर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करुन इतरांच्या संपर्कात किंवा त्यांना संदेश पाठवू शकता.

1. टेलिग्राम (Telegram)

व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय असणारे हे अ‍ॅप तसे सर्वांना माहित आहे. अनेकजण या अ‍ॅपचा वापर करतात.
यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे इन्क्रीप्शनसह महत्त्वाचे फिचर्स आहेत.
यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. हे अ‍ॅफ फ्रि आहे.

2. सिग्नल (Signal)

सुरक्षेला प्राधान्य देणारे हे अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे संहसंस्थापक ब्रियान अ‍ॅक्टन (Brian Acton) यांनी हे अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी मदत केली होती.

यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे सर्व फीचर्स असून हे अ‍ॅप एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहे.

3. आय मेसेजेस (iMessages)

हे अ‍ॅप Apple iPhone युजर्ससाठी आहे. हे चांगल्या प्रकारचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप असून यामध्ये युजर्संना फ्रीमध्ये टेस्ट करता येते.

4. डिसकॉर्ड (Discord)

हे एक फोरमसारखे प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्हाला टेक्स्ट किंवा ग्रुपचॅट करता येते.

5. मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams)

हे मायक्रोसॉफ्टचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे सॉफ्टवेअर (Conferencing software) आहे.
याचा वापर देखील तुम्हाला मित्र-मैत्रिणींना मेसेज करण्यासाठी करता येईल.
त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप जर बंद झाले तर तुम्ही याचा वापर करुन गप्पा मारु शकता.

Web Title : FB-WhatsApp Technical Error | facebook outage these are some whatsapp alternatives so that communication is never down try Signal, Telegram, Discord, Microsoft Teams and iMessages

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! सणापूर्वी कमी झाला सोन्याचा दर, सर्वोच्च स्तरापासून मिळतंय 10582 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

Kirit Somaiya | अजित पवारांनी ‘जरांडेश्वर’च्या मालकाचे नाव घोषित करावे, किरट सोमय्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Svamitva Scheme | PM मोदींकडून 1.71 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्डचं वाटप, पंतप्रधान म्हणाले – ‘आता सरकारकडे गरीबांनी फेर्‍या मारण्याचे युग संपले’

Related Posts