IMPIMP

FD Interest Rates | ‘या’ बँकेने केली FD वरील व्याजदरात वाढ

by nagesh
Banking Deposit Transaction Rules Changed | govt changed to banking deposit transaction rules now pan aadhaar mandatory for cash deposits

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन FD Interest Rates | आईडीबीआई या खासगी बँकेने (IDBI Bank) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. IDBI बँकेकडून दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. त्यानंतर आता एफडी (FD Interest Rates) करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे. या व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू होणार आहे.

यापूर्वी HDFC बँकेने याबाबत घोषणा केली होती. आता आईडीबीआई बँकेने देखील व्याजदरात बदल केला आहे. बदलानंतर, IDBI बँक सहा दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 टक्के ते 5.60 टक्के व्याज देत आहे. याआधी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) देखील एफडी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. (FD Interest Rates)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, आईडीबीआई बँकेने (IDBI Bank) 7 दिवसांपासून 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 2.7 टक्के पहिला व्याजदर कायम ठेवला आहे. 31 दिवस ते 45 दिवस या कालावधीत आता 2.80 टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळणार आहे.

IDBI बँकेचे FD व्याजदर नवे व्याजदर काय आहेत ?

7 – 14 दिवस – 2.7 टक्के
15 – 30 दिवस – 2.7 टक्के
31 – 45 दिवस – 3 टक्के
46 – 60 दिवस – 3.25 टक्के
61 – 90 दिवस – 3.4 टक्के 3.9
91 दिवस ते 6 महिने – 3.75 टक्के
6 महिने ते 270 दिवस – 4.4 टक्के
271 दिवस ते 1 पेक्षा कमी – 4.5 टक्के
1 वर्षासाठी – 5.15 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.25 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.35 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे – 5.5 टक्के
5 वर्षांसाठी – 5.6 टक्के
5 वर्षे ते 7 वर्षे – 5.6 टक्के
7 वर्षे ते 10 वर्षे – 5.5 टक्के

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- FD Interest Rates | idbi bank new rule fd interest rates check here latest rates

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis On Raj Thackeray | राज ठाकरेंचे आधीचे बोल गुलुगुलु वाटायचे अन् आता खाजवायला होतंय- देवेंद्र फडणवीस

Pune Water Problem | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

Diabetes | मधुमेहाच्या रूग्णांनी ‘या’ 4 फळांचं सेवन करून नये, अन्यथा…

Related Posts