IMPIMP

Fifa Football World Cup 2022 | नको ‘त्या’ कारणांसाठी चर्चेत असलेला फुटबॉल विश्वचषक नव्या वादात; आयोजक करणार दारूबंदी?

by nagesh
Fifa Football World Cup 2022 | fifa world cup 2022 qatar to sell non alcoholic beverages only new regulations know details

कतार : वृत्तसंस्था – दर चार वर्षांनी होणार फुटबॉल विश्वचषक (Fifa Football World Cup 2022) यावेळेस मध्यपूर्व मधील कतार (Qatar) देशात होणार आहे. रविवारपासून (18 नोव्हेंबर) जगातील सर्वात मोठ्या क्रीडा कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे फिफा विश्वचषक (Fifa Football World Cup 2022) सुरु होत आहे. हा सोहळा डोळ्यांनी पाहता यावा यासाठी फुटबॉल चाहते कतारमध्ये आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, कतारने अचानक त्यांच्या मद्य धोरणात (Alcohol Policy) बदल केला आहे. ज्यामुळे दोहा आणि आसपासच्या आठ फुटबॉल स्टेडियममध्ये बिअरच्या विक्रीवर सक्त बंदी करण्यात आली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, कतारचे अधिकारी फिफा विश्वचषकाचा प्रायोजक बडवायझरच्या (Budweiser) बीयरच्या सर्व विक्रीवर बंदी घालण्यासाठी दबाव आणत आहेत.

कतारची विश्वचषक (Fifa Football Worldcup 2022) आयोजन समिती आणि फिफा यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. प्रत्येक विश्वचषकावेळी बडवायझर (Budweiser) ही कंपनी मैदानात बीअर विकण्याच्या विशेषाधिकार लाखो डॉलर्स विकत घेते. फिफासोबतची बडवायझरची ही भागीदारी 1986 पासून सुरू आहे,
मात्र यावेळी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक आयोजित केला जात आहे.
त्याठिकाणी दारुबंदीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

कतार हा एक मुस्लिम देश असून मुस्लिम धर्मामध्ये मद्यपानास निषेध आहे.
शिवाय कतार करत आलेल्या मानवी हक्काचे उल्लंघन पाहता अनेकांनी फिफाने
कतारमध्ये विश्वचषकाचे आयोजन करू नये अशी मागणी केली होती.
त्यात दारूबंदीमुळे या कार्यक्रमाच्या वादात अजून भर पडली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Fifa Football World Cup 2022 | fifa world cup 2022 qatar to sell non alcoholic beverages only new regulations know details

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘कारागृहात माझे 10 किलो वजन कमी झाले’ – संजय राऊत

Pune Crime | जळगावमध्ये व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Chagan Bhujbal | ‘राहुल गांधींनी हा मुद्दा टाळला पाहिजे, त्यांच्यासमोर इतरही प्रश्न आहेत’ – छगन भुजबळ

Related Posts