IMPIMP

FIFA World Cup 2022 | फिफा विश्वचषक 2022 मध्ये रेफ्रीची भूमिका सांभाळणारी मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली महिला

by nagesh
FIFA World Cup 2022 | maria rebelo becomes indias first woman to referee germany vs costa rica mens football match

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – FIFA World Cup 2022 | सध्या कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना जर्मनी विरुद्ध कोस्टारिका यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात जर्मनीने कोस्टारिका संघावर 4-2 अशा फरकाने मात करून तो सामना जिंकला होता. या सामन्यात स्टेफनी फ्रापार्ट आणि मारिया रेबेलोने (Maria Rebelo) यांनी महिला रेफ्री म्हणून काम पाहिले. यापैकी मारिया रेबेलो ही भारतीय आहे. मारिया मूळची गोव्याची, पुरुषांच्या आय-लीग सामने आणि संतोष ट्रॉफीमध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला आहे. (FIFA World Cup 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मारिया रेबेलोने व्यक्त केले मत
“हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जो आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा देईल. मी देशातील जवळपास सर्वच पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धांचा एक भाग आहे. नजीकच्या भविष्यात आणखी महिला या व्यवसायात उतरतील,” असे मारिया रेबेलोने या सामन्यानंतर व्यक्त केले. (FIFA World Cup 2022)

मारियाची कारकीर्द
मारिया 2010 पासून संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या क्लस्टर सामन्यांचे रेफ्री म्हणून कार्यरत आहे. ती भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार आहे. तसेच, तिची आय-लीग 2013-14 च्या हंगामासाठी रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मारिया 2011 पासून फिफा-सूचीबद्ध रेफ्री आहे. तसेच भारतात झालेल्या सतरा वर्षांखालील फिफा महिला विश्वचषकादरम्यान, मारियाला स्पर्धेसाठी रेफ्री मूल्यांकनकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

गोव्यातील कर्टोरिम येथे जन्मलेल्या रेबेलोला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती.
यामुळे तिने लहान वयातच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान तिने 2001 मध्ये एएफसी महिला चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वदेखील केले होते.
त्यानंतर तिने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खेळातून निवृत्ती घेतली आणि रेफ्रीमध्ये आपले नशीब आजमावले.
यानंतर तिने गोव्याच्या स्थानिक लीगमधील पुरुषांच्या सामन्यांत रेफ्री म्हणून काम केले.
त्यानंतर एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील काही सामन्यांमध्ये तिने रेफ्री म्हणून काम पहिले.
यानंतर तिने मागे वळून पहिले नाही.
आता तर फुटबॉलमधील मोठी लीग फिफा विश्वचषकमध्ये तिने जर्मनी विरुद्ध कोस्टारिका या सामन्यात रेफ्रीची भूमिका पार पाडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- FIFA World Cup 2022 | maria rebelo becomes indias first woman to referee germany vs costa rica mens football match

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा गुजरातमध्ये विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…म्हणून काँग्रेस नेत्यांनी PM मोदींना शिव्या देणं सुरू केलं’

Related Posts