IMPIMP

Forbes List | ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या लिस्टमध्ये पुण्याच्या ‘प्रतिमा जोशी’ यांचा समावेश

by bali123
Forbes List | Pune Architect pratima joshi forbes list powerful women

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Forbes List | आंतरराष्ट्रीय मासिक असलेल्या फोर्ब्सने शक्तिशाली महिलांच्या लिस्टमध्ये (Forbes List) पुण्याच्या प्रतिमा जोशी (Pratima Joshi) यांचा समावेश करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 च्या अंकात त्यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबाबत त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख देखील आहे. (Forbes List Of Powerful Women) प्रतिमा जोशी या व्यवसायाने वास्तूरचनाकार (Architect) आहेत.

त्या 1987 पासून झोपडपट्टीतील रहिवाशांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील 7 शहरांत त्यांचे काम असून, गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून 25 हजार शौचालयांचे बांधकाम (Construction of toilets) केले आहे. तर, या कामासाठी त्यांनी अभ्यासपूर्वक पद्धत विकसित केली आहे. शौचालयांच्या बांधकामांबरोबरच झोपडपट्टयांमधील घरांना त्यांची स्वत:ची खास ओळख ‘गुगल’द्वारे मिळवून देण्याचा यशस्वीरित्या त्यांनी प्रयत्न केला आहे. (Forbes List)

जोशी यांचे पदवीचे शिक्षण झाल्यानंतर समाजिक कामात त्या अग्रेसर झाल्या. तसेच कोणतेही काम अभ्यासपूर्वक करायचे, या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी प्रथम झोपडपट्ट्यांचा नकाशा तयार करण्यास सुरूवात केली. घरांच्या जागेसह या नकाशात जलवाहिन्या, मैलावाहिन्या, पाण्याची उपलब्धता याची देखील योग्य माहिती असते. त्यामुळे काम करणे सोपे होते, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे, पिंपरी – चिंचवड, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे व अन्य काही
महापालिकांमध्ये मिळून जोशी यांनी आतापर्यंत 25 हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे.
यासाठी त्यांनी एकदाही सरकारी आर्थिक मदत घेतलेली नाही.
‘सीएसआर’ फंडातून त्यांनी हे काम केले आहे. तसेच त्यांनी काम केेलेल्या ठिकाणच्या
महिला व युवतींच्या आरोग्याची तपासणी गोखले संशोधन संस्थेने केली.
त्यात ‘युरीन’शी संबधित आजारांचे प्रमाण तब्बल 93 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले.
त्याशिवाय अनेक महिलांनी आता आमचे खाणे व पाणी पिणे यात चांगली वाढ झाली आहे. असं प्रतिमा जोशी यांनी सांगितले.

Web Title : Forbes List | Pune Architect pratima joshi forbes list powerful women

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts