IMPIMP

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

by nagesh
former Indonesian President Sukarno | sukmawati sukarnoputri daughter of former president to convert from islam to hinduism

जकार्ता : वृत्तसंस्था former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्णो (former Indonesian President Sukarno) यांच्या कन्या सुकमावती सुकर्णोपुत्री (Sukmawati Sukarnoputri) यांनी हिंदू धर्म (Hinduism) स्वीकरण्याचा निर्णय घेतला आहे. सुकमावती इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी 26 ऑक्टोबरला विशेष पूजेत सहभागी होतील.

सीएनएन इण्डोनेशियाच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी सुकर्णो हेरिटेज एरिया (Sukarno Heritage Area) मध्ये विशेष पूजाविधीचा हा कार्यक्रम होणार आहे.
हे ठिकाण बाली (Bali) मध्ये आहे. सुकमावती 70 वर्षांच्या असून माजी राष्ट्रपती सुकर्णो यांच्या तृतीय कन्या आहेत.
तर माजी राष्ट्रपती मेगावती सुकर्णोपुत्री (Megawati Sukarnoputri) यांच्या त्या छोट्या भगिनी सुद्धा आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

का घेतला हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय

सुकमावती इण्डोनेशियामध्येच राहात आहेत. रिपोर्टनुसार, 2018 मध्ये कट्टरपंथीय इस्लामिक गटाने त्यांच्याविरूद्ध ईशनिंदा केल्याची तक्रार दाखल केली होती.
सुकमावती यांच्या एका कवितेवर कट्टरपंथी इस्लामिक गटांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी यास इस्लामचा अपमान म्हटले होते.

संडे मॉर्निंग हेराल्डनुसार, वाद वाढल्यानंतर सुकमावती यांनी माफी मागितली होती. मात्र, अजूनही या वादावरून त्यांच्यावर टीका होत असते.
इण्डोनेशियामध्ये इस्लाम धर्म मानणार्‍या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. इतकेच नव्हे, इण्डोनेशिया जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.

रिपोर्टनुसार, सुकमावती यापूर्वीसुद्धा हिंदू धर्माच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात असत.
सुकमावती यांनी हिंदू धर्मशास्त्र सुद्धा चांगल्याप्रकारे वाचले आहे आणि मागील अनेक वर्षांपासून हिंदू धर्मात येण्याचा विचार करत होत्या.

Web Title : former Indonesian President Sukarno | sukmawati sukarnoputri daughter of former president to convert from islam to hinduism

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | पाय खोलात ! वानखेडेंना दुहेरी दणका; NCB नं चौकशी सुरु करण्यापूर्वीच अडचणीत वाढ

Petrol Diesel Price Pune | एक दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | घरातून निघून गेलेल्या पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण; चांदणी चौकातील घटना

Related Posts