IMPIMP

Former MLA Baburao Pacharne Passed Away | शिरुर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

by nagesh
Former MLA Baburao Pacharne Passed Away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Former MLA Baburao Pacharne Passed Away | शिरुर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते (BJP Senior Leader) बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन (Former MLA Baburao Pacharne Passed Away) झाले. आज (गुरुवार) दुपारी 12.15 वाजता वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 1 ते 3 या दरम्यान त्यांचे पार्थिव बाबुराव नगर येथील पाचर्णे रेस्टहाऊसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सायंकाळी 4 वाजता तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषी पर्य़टन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाचर्णे यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणापासून दूर झाले होते. दीड वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढउतार झाले. मात्र, दीड वर्षाच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयव देखील निकामी होत गेले आणि आज अखेर खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत (Former MLA Baburao Pacharne Passed Away) मालवली.

बाबुराव पाचर्णे यांचा राजकीय प्रवास

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1978 साली ते शिरुर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर ते शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवत त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला.

1985 ते 1993 असे सलग 8 वर्षे ते पाचर्णे बाजार समितीचे सभापती होते. बाबुराव पाचर्णे यांनी 1995 ला अपक्ष म्हणून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक (Legislative Assembly Election) लढवली. त्या निवडणुकीत केवळ 678 मतांनी पराभव झाला. 1999 ची निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून (Congress) लढवली. मात्र या निवडणूकीत ही त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते पुन्हा अपक्ष म्हणून लढले
आणि त्यांचा पराभव झाला.2014 च्या निवडणुकीत ते पुन्हा स्वगृही परतले आणि पुन्हा यश खेचून आणले.
राजकीय कारकिर्दीतील शेवटच्या ठरलेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Former MLA Baburao Pacharne Passed Away

हे देखील वाचा :

Panshet Dam | पानशेत धरण 100 टक्के भरले ! नदीत 7376 क्युसेक्सचा विर्सग सुरु, मुळशीही 88 टक्के भरले

Rain in Maharashtra | राज्यात आज ‘येलो अलर्ट’ ! पुणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का ? दीपक केसरकर म्हणाले…

Related Posts