IMPIMP

Former MLA Mohan Joshi | रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख काँग्रेस करणार आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation's visit is a mere stunt - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Former MLA Mohan Joshi | मध्यवस्तीतील रस्त्यांची खोदकामाने दुर्दशा झाली असून दुरुस्तीसाठी
महापालिकेतील (Pune Corporation) सत्ताधारी भाजपचे (BJP) पदाधिकारी तारीख पे तारीख देत आहे. यात पुणेकरांना मात्र मनस्ताप सहन करावा
लागत आहे. भाजपच्या या निष्क्रीयतेविरोधात काँग्रेस पक्ष व्यापक आंदोलन करणार आहे, असे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष
मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi ) यांनी जाहीर केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते खोदाईमुळे गेले ४ महिने बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी रस्ते आणि त्याला जोडले जाणारे छोटे रस्ते यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होते आहे, शिवाय खोदाईनंतर दुरुस्ती लांबल्याने पेठांमधील रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रहिवाशांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आंदोलन करून भाजपच्या कारभाराविरोधात निषेध नोंदविला जाईल, असे मोहन जोशी  यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मध्यवस्तीतील सदाशिव पेठ (Sadashiv Peth), नारायण पेठ (Narayan Peth), शुक्रवार पेठ (Shukrawar Peth) अशा पेठांमध्ये खोदकामे होऊन रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. लक्ष्मी रस्त्यावर पाईपलाईनच्या कामासाठी खोदाई केली आणि नंतर डागडुजी निकृष्ट दर्जाची केल्याने बाजारपेठेतील या रस्त्याची रया गेली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी आधी डिसेंबर अखेर, त्यानंतर २० जानेवारी आणि आता आणखी १५ दिवस लागतील अशा वेगवेगळ्या तारखा रासने यांनी दिल्या आहेत. तारीख पे तारीख देण्यातच ते मश्गुल आहेत, प्रशासनावर काहीही नियंत्रण नाही.
गेल्या ५ वर्षात भाजपला मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले नाही आणि छोटी छोटी नागरी सुविधांची कामेही करता आलेली नाहीत,
शहराचा खेळखंडोबा करून टाकला,अशी टीका मोहन जोशी (MPCC vice-president Mohan Joshi) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Former MLA Mohan Joshi | Congress will stage agitation on the condition of roads and BJP’s pay date  Former MLA Mohan Joshi

हे देखील वाचा :

Beed Crime | 30 वर्षीय ‘कल्याणकारी’ विवाहीत महिलेचं युवकाशी जुळलं सूत, नवर्‍याला ‘लफडं’ समजलं अन् भलतंच घडलं

Hingoli Crime | 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेत केला अत्याचार, आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

Pune Lohegaon Airport | कोरोनाची संख्या वाढली, प्रवासी संख्या घटली ! पुण्यातील दररोज उड्डाण होणारे 20 ते 25 विमाने रद्द

Related Posts