IMPIMP

Former MLA Mohan Joshi | ‘माजी मंत्री जावडेकर, खासदार बापट, महापौर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा’; नदी सुधार योजना ही स्टंटबाजी – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation's visit is a mere stunt - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनFormer MLA Mohan Joshi | महापालिका निवडणुका Pune Corporation Elections (PMC Elections) जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाला (BJP) मुळा – मुठा नदी सुधारणेबाबत (Mula Mutha River Development Project) जाग आली असून त्यासाठीच्या कामाची निव्वळ स्टंटबाजी केली जात आहे, वास्तविक या प्रकल्पाला लागलेल्या विलंबाबद्दल माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) , विद्यमान खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुळा – मुठा नदी सुधारणेच्या (Pune River Rejuvenation Project) कामाला जपानमधील जायका कंपनी Japan International Cooperation Agency (Jica) आणि केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी दिल्याने कामास लवकरच सुरुवात होईल अशी घोषणा भाजपच्या महापौरांनी केली आहे. हा निव्वळ देखावा आहे. सात वर्षांपूर्वीच केंद्राने मंजुरी दिली होती. भाजपने तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सत्कार त्यावेळीचे खासदार अनिल शिरोळे (Anil Shirole) यांच्या हस्ते केला होता. नदी सुधारणा कामांशी संबंधित पर्यावरण खात्याचे मंत्रीपद प्रकाश जावडेकर यांच्याकडे होते. मात्र, सत्कार समारंभ झाले. पण, गेली सात वर्षे या प्रकल्पाला माजी खासदार शिरोळे, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान खासदार गिरीश बापट, महापालिकेतील (Pune Corporation) भाजपचे पदाधिकारी मार्गी लावू शकलेले नाहीत.

३१ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा निधी परत जातोय की काय ? अशी परिस्थिती उदभवली होती याची कबुलीच खासदार बापट यांनी दिलेली आहे. सात वर्षे हे निष्क्रीय राहिले आणि आता निवडणूक आली म्हणून धडपड करुन प्रकल्प मंजुरीचे पत्र आणले आहे. एव्हाना हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता. ती निष्क्रियता लपवून ठेवायची आणि प्रकल्पाचे काम मार्गी लावत असल्याचा गाजावाजा करत स्वत:ची पाठ थोपटून घ्यावयाची असा प्रकार खासदार बापट आणि भाजपची नेते मंडळी करीत आहेत, केवळ नदी सुधारणा प्रकल्पच नव्हे तर स्मार्ट सिटी (Pune Smart City) सारख्या अन्य अनेक प्रकल्पांना पूर्णत्त्वास नेण्यात भाजपच्या या लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने त्यांना पुणेकरांनी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे. (Former MLA Mohan Joshi)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पाचा खर्च सुमारे ५५० कोटी रुपयांनी वाढलेला आहे.
प्रकल्पासाठी होणाऱ्या सुमारे १४७३ कोटी खर्चापैकी ८४२ कोटी केंद्र सरकार देणार आहे.
उर्वरित ५५० कोटी खर्चाचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी बसणार आहे. याला जबाबदार असलेल्या भाजपला, पुणेकरांसमोर जाब द्यावा लागेल,
असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title :- Former MLA Mohan Joshi | Former Union Minister Prakash Javadekar MP Girish Bapat Mayor Muralidhar Mohol should be given incompetent people s representative award Pune River Rejuvenation Project scheme is a stunt former MLA Mohan Joshi

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘वीज बिले भरावीच लागतील, ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफी नाही’, अजित पवारांनी केलं स्पष्ट

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | लाचेचे 3500 रुपये घेऊन पोलीस उपनिरीक्षक फरार, अ‍ॅन्टी करप्शनकडून शोध मोहिम

PF New Rules | मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर सुद्धा लागणार टॅक्स, जाणून घ्या कुणावर होणार परिणाम

Police Commit Suicide | राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

Related Posts