IMPIMP

Fuel Price Hike Impact On Milk Delivery | इंधन दरवाढीची झळ दूध वितरकांनाही ! कमिशन वाढवून मिळावे यासाठी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील ‘गोकुळ’ दूध वितरकांचा दूध न उचलण्याचा इशारा

by nagesh
Fuel Price Hike Impact On Milk Delivery | Milk distributors too affected by fuel price hike Gokul milk distributors in Bibvewadi Katraj area warned not to pick up milk to increase commission

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनFuel Price Hike Impact On Milk Delivery | इंधन दरवाढीचा फटका आता असह्य होऊ लागला आहे. हा फटका केवळ अंतिम ग्राहकालाच न्हवे तर साखळीतील प्रत्येकच घटकालाच बसत असल्याचे दिसून येत असून हे घटकही हळूहळू (Gokul Milk) उठाव करू लागले आहेत, याची झलक दूध विक्रेत्यांनी (Milk Sellers) दाखवली आहे. दूध दरवाढ (Milk Price Hike) आणि त्यावर इंधन दरवाढ (Petrol Diesel Price Hike) बोनस मध्ये मिळाली असली तरी ‘कमिशन’ वाढत (Commission On Milk Delivery) नसल्याने कात्रज, बिबवेवाडी, बालाजी नगर, धनकवडी (Katraj, Bibvewadi, Balaji Nagar, Dhankawadi) परिसरातील गोकुळ दूध (Gokul Dudh Distributors) वितरकांनी 30 एप्रिल पासून दूधच न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (Fuel Price Hike Impact On Milk Delivery)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शेतकरी ते डेअरी आणि तेथून मुख्य वितरक, उप वितरक, किरकोळ विक्रेते असा प्रवास करून दूध अखेर ग्राहकाच्या भांड्यात पडते.
प्रत्येकच टप्प्यावर वाहतूक असल्याने इंधन दरवाढीचा फटका बसू लागला आहे.
अशातच गोकुळ सारख्या दूध उत्पादक संघाने (Gokul Dudh Sangh) बऱ्याच वर्षात वितरकांचे कमिशन वाढविलेले नाही.
एकीकडे वितरण खर्च दुपटीवर गेला असताना कमिशन वाढत नसल्याने केवळ ‘हमाली’ करायची ? असा प्रश्न वितरक उपस्थित करू लागले आहेत.
अडचण एवढ्यावरच थांबत नाहीच तर लिकेज व खराब झालेल्या दूध पिशव्या बदलून न मिळणे, गाडी वेळेवर न येणे, रात्रीच्यावेळी दुधासह क्रेट चोरीला जाणे या समस्याही असल्याने कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, बिबवेवाडी परिसरातील उप वितरकांनी डेअरी तसेच मुख्य वितरकाकडे देखील तक्रार केली, बैठका घेतल्या परंतु यातून मार्ग निघाला नाही.
यामुळे येत्या 30 एप्रिल पासून गोकुळ दूधच न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
वरील परिसरात गोकुळ चे सुमारे 25 हजार लिटर दुध दररोज वितरित होते, असे वितरक सांगतात. (Fuel Price Hike Impact On Milk Delivery)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गोकुळ दूध चे येथील मुख्य वितरक संजय ढेरे (Sanjay Dhere Main Distributor Of Gokul Milk) यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले गेल्या काही वर्षांत गोकुळ ने वितरकांचे कमिशन वाढवलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
इंधन दर वाढत असताना विरणाचा खर्च ही वाढत असून त्याप्रमाणात कमिशन वाढवून द्यावे अशी मागणी गोकुळ डेअरी च्या संचालक मंडळाला केली आहे.
आज कोल्हापूर येथे यासंदर्भात संचालक मंडळाची बैठक आहे.
या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल. एक तारखेपासून कमिशन वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे उप वितरकांनी सबुरीने निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title :- Fuel Price Hike Impact On Milk Delivery | Milk distributors too affected by fuel price hike Gokul milk distributors in Bibvewadi Katraj area warned not to pick up milk to increase commission

हे देखील वाचा :

Pune Crime | अश्लील मेसेज पाठवून बिबवेवाडीतील 32 वर्षीय महिलेची केली बदनामी; मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात देवेंद्र फुलफगरवर गुन्हा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts