IMPIMP

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

by bali123
Pune Ganesh Utsav 2022 | 5 days permission for use of loudspeakers during pune Ganeshotsav 2022

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ganesh Utsav | राज्यात दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या मोठ्या उत्सवाचे अर्थात सार्वजनिक गणेशोत्सवाचे (Ganesh Utsav) स्वागत थाटामाठात होईल का? हा प्रश्न सर्व गणेश भक्तांना लागून आहे. कारण गेल्या दिड वर्षांपासून राज्यासह जगात कोरोनाचं संकट ओढलं आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर (Ganesh Utsav) यंदा देखील कोरोनाचे सावट दिसत आहे. यामुळेच आता मूर्तिकार, कारागीर, गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळे वस्तू तयार करणारे कारागीर, विक्रेते आणि श्री गणेश भक्त यांच्या अस्वस्थता दिसून येत आहे. दरम्यान ही अस्वस्थता बाजूला करण्यासाठी राज्य शासनाने (Maharashtra government) ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधक 2 लस (Corona vaccine) घेतलेल्या प्रवाशी नागरिकांना रेल्वे आणि मेट्रो प्रवासाची पारंगी दिली आहे.
लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा कोरोना होण्याची आणि त्यांच्यापासून इतरांना
लागण होण्याची शक्यता कमी आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार म्हणत आहेत.
म्हणून, महाराष्ट्राची अस्मिता असणारा हा गणेशोत्सव राज्य सरकारने (Maharashtra government) साजरा करण्याची मुभा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने राज्याचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे करण्यात आलीय.

जयराज लांडगे (Jayaraj Landage) (मनसे जनहित विधी कक्ष सरचिटणीस – महाराष्ट्र राज्य संपर्क
अध्यक्ष -कोल्हापूर) म्हणाले की, ‘आर्थिक उत्पन्नाची साधने विस्कळीत झाली आहेत.
राज्य सरकारने ही अवस्था टाळण्यासाठी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम गणेशभक्तांच्या विश्वासाला बळ देण्यासाठी गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी.
2 डोस घेतलेल्या नागरिकांना मुक्त प्रवेश असावा अशी मागणी देखील मनसेच्या (MNS)
वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title : Ganesh Utsav | ganeshotsav 2021 mns covid vaccine two doses celebration

Crime News | पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित

Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’

Hurun Global 500 | जगातील 500 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये 12 भारतातील; रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात वर

Related Posts