सरकारसत्ता ऑनलाइन – Alia Bhatt | सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)’ मुळं प्रेक्षकांचा चांगलीच चर्चेत आहे. मात्र कोराना रोगाच्या पार्श्वभूमीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं होतं. तसेच या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या (Gangubai Kathiawadi) प्रदर्शनाची तारीख बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आली होती.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
अखेर ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच म्हणजे 25 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी आपल्या ट्विटरवर केलीये.
#Xclusiv… 'GANGUBAI KATHIAWADI' NEW RELEASE DATE: 25 FEB 2022… #SanjayLeelaBhansali's #GangubaiKathiawadi – starring #AliaBhatt and #AjayDevgn – to release in *cinemas* on 25 Feb 2022… Will have its world premiere at the prestigious 72nd Berlin International Film Festival. pic.twitter.com/c5H0PlOIbj
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2022
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (Sanjay Leela Bhansali) हा चित्रपट (Gangubai Kathiawadi) गेल्या अनेक दिवसांपासून रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali), चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) आणि इतर अनेक चित्रपटातील कलाकारांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रपटचे शूटिंग देखील पुढं ढकलण्यात आलं होतं. मात्र अखेर लवकरच 25 फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून, रसिक प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.
दरम्यान, या चित्रपटांमध्ये आलिया भट्टने (Alia Bhatt ) गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली आहे. तर आलिया भट्ट प्रथमच आपल्याला हटके लूकमध्ये दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला असून, ट्रेलरमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या साथीमुळं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून, आता 25 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Web Title : Gangubai Kathiawadi | alia bhatt and sanjay leela bhansali film gangubai kathiawadi release date announced
Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक