IMPIMP

Gangubai Kathiawadi | …म्हणून ‘गंगुबाई काठियावाडी’ला कुटुंबियांचाच विरोध; चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी

by nagesh
Gangubai Kathiawadi | gangubai kathiawadi family allegations as defamatory script given to gangubai kathiawadi movie ban demand of family Alia Bhatt Movie

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) यांच्या आयुष्यावर आधारित गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट प्रदर्शनाच्या आगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. या चित्रपटात गंगुबाई काठीयावाडी यांचे चित्रण वास्तवाला सोडून रंगवल्याचे म्हणत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बदनामी (family defamation script) केल्याचा आरोप गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबियांनी (Gangubai Kathiawadi Family) केला. त्याचबरोबर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील कुटुंबियांनी केलीय.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लेखक एस. हुसेन झैदी (S. Hussein Zaidi) यांच्या पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात आलिया भट (Alia Bhatt) प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित झालाय. दरम्यान यामध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टींवर गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतलाय. (Gangubai Kathiawadi)

गंगुबाई यांची मुलगी बबीता गौडा (Babita Gowda) म्हणाली, ”गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसून आणून कधीही विकले नसल्याचे म्हणाली. गंगुबाई यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची फार आवड होती, त्यामुळे त्या स्वतःहून गुजरात येथील आपल्या घरातून पळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून वेश्याव्यवसाय कधीही केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.”

गंगुबाई यांचा नातू विकास गौडा (Vikas Gowda) म्हणाले, ”कामाठीपुरा परिसरात गंगुबाई वास्तव्यास होत्या.
त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणामध्ये वेश्याव्यवसाय चालायचा. येथील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, अनेक महिलांवर अत्याचार देखील होत होते.
त्याविरोधात गंगुबाई यांनी संघर्ष सुरू करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला.
तसेच, या महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी त्यावेळचा माफिया डॉन करीम लाला यांची भेट घेऊन मदत मागितली होती.
गंगुबाई यांनी करीम लाला यांना राखी बांधल्याने ते गंगुबाई यांना आपली बहीण मानत असत. यामुळे गंगुबाई यांच्यासह इतर महिलांवरील अत्याचार थांबले व त्यांना न्याय मिळाला असं त्यांनी सांगितलं. तसेच, गंगुबाई ह्यांनी कधीही कुणाला मारहाण, शिवीगाळ केली नाही. त्या अतिशय प्रेमळ होत्या म्हणूनच येथील लोकांत त्या गंगू माँ म्हणून प्रसिद्ध झाल्याचे ही विकास यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या पुस्तकात न लिहिता अनेक काल्पनिक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय असा आरोप विकास गौडा यांनी केला आहे.
गंगुबाई काठीयावाडी यांचा उल्लेख त्या पुस्तकात गंगुबाई कोठेवाली असा चुकीचा करण्यात आल्याचं विकास यांनी सांगितलं.
त्यामुळे या पुस्तकावर आधारित या चित्रपटामुळे गंगुबाई यांचे व्यक्तिमत्व बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
असून त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील त्यांनी केलीय.
दरम्यान, या चित्रपटावर अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई या तेलगु समाजाच्या संघटना देखील आक्षेप नोंदवला आहे.
तसेच येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही आक्षेप नोदंवला आहे.
तसेच, या चित्रपटाला स्थानिक आमदार अमीन पटेल (MLA Amin Patel) यांनीही विरोध दर्शवला आहे.

Web Title :- Gangubai Kathiawadi | gangubai kathiawadi family allegations as defamatory script given to gangubai kathiawadi movie ban demand of family Alia Bhatt Movie

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | 50 पैशांचा ‘हा’ शेयर 60 रुपयांवर पोहोचला, 1 लाखांचे केले रू. 1.20 कोटी, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या लोकांवर FIR

Related Posts