IMPIMP

Girish Mahajan on Sanjay Raut | “सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर, ती भूमिका संजय राऊतांना मिळाली असती”

by nagesh
Girish Mahajan On Shivsena | bjp leader and former minister girish mahajan criticised shiv sena and sanjay raut over rajya sabha election 2022

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Girish Mahajan on Sanjay Raut | मराठी अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ (Songadya) चित्रपट काढला असता, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यासोबतच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ओठांच्या खाली सॉस लावल्याचं अग्रलेखात म्हटलं होतं. याला भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीष महाजन (Girish Mahajan on Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जखम किती होती याला महत्व नाही, हल्ला झाला, दगडफेक झाली हे महत्वाचे आहे. टोमॅटो सॉस होता तर तुम्ही त्याची चव घेतली का?,
गोड वाटलं का?, असं म्हणत गिरीष महाजन यांनी निशाणा साधला.
त्यासोबतच सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर संजय राऊत यांनाच सोंगाड्याची भूमिका मिळाली असती,
असं म्हणत महाजन (Girish Mahajan on Sanjay Raut) यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) ‘मातोश्री’बाहेर (Matoshree) आलेल्या आजींना भेटण्यासाठी सहपरिवार गेले मात्र बैठकीला का जात नाहीत?,
भोंग्याच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसतील तर उपयोग काय?,
तुम्हाला चिंता नाही आम्ही घरून बैठकीला उपस्थित राहतो असं चालणार नसल्याचं महाजन म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या (Shivsena) सगळ्याच भूमिका बदललेल्या आहेत.
बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) जी शिवसेना होती ती वेगळी होती आणि ही सत्तेसाठी लाचार झालेली
सेना असून खुर्चीसाठी हिंदूत्त्वाची आहुती द्यायलाही तयार असल्याचं म्हणत महाजनांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Girish Mahajan on Sanjay Raut | shiv sena helpless for power sacrifice of hindutva for chair girish mahajans allegation raut songadyas hero who tastes the sauce

हे देखील वाचा :

Sanjay Raut On Underworld | संजय राऊतांनी सांगितलं, हनुमान चालिसा, भोंगे प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन; म्हणाले…

Anti Corruption Bureau (ACB) Satara | बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 3 लाखाच्या लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pinched Nerve Remedies | शरीरातील नस दबल्याने गंभीर वेदना होत आहेत का? मिनिटात आराम देतील ‘हे’ 5 उपाय, आखडण्याची समस्या होईल दूर

Related Posts