IMPIMP

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

by bali123
gold and silver price increased today while 11500 down from record highs check mcx rates

नवी दिल्लीगेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होणा-या सोन्या- चांदीच्या भावात बुधवारी (दि. 17) किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे gold दराचे ट्रेडिंग तेजीत सुरू झाले. 77 रुपयांच्या वाढीमुळे सोन्याचे दर 44 हजार 890 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 76 रुपयांनी वाढले असून चांदीचे दर 66 हजार 995 रुपये प्रति किलो झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, त्यानंतर सोन्याच्या gold दरात 11 हजार 500 हजार रुपयांची घसरण झाली आहे. अर्थात गेल्यावर्षी पेक्षा सोन्याचे दर खूप कमी झाले आहेत.

प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचा gold आजचा भावः दिल्ली- 48150 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट), चेन्नई- 46100 रुपये प्रति तोळा, मुंबई- 44,840 रुपये प्रति तोळा, कोलकाता- 46,900 रुपये प्रति तोळा असे आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये सोन्याच्या दरात 4.16 डॉलरची तेजी होती. यानंतर दर 1,735.93 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.01 डॉलरच्या घसरणीमुळे 26.19 डॉलरच्या स्तरावर आहेत. दरम्यान दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 45 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 44,481 रुपये प्रति तोळा झाले होते. तर चांदीच्या दरात किरकोळ 116 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर चांदीचे भाव 66,740 रुपये प्रति किलो झाले होते.

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Related Posts