IMPIMP

Gold Demand | गतवर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत ‘इतकी’ वाढ; जाणून घ्या

by nagesh
Gold Demand | gold demand rises 47 in july september says world gold council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Demand | सप्टेंबर महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेमध्ये जुलै ते सप्टेंबरचा मागणीचा (Gold Demand) आकडा समोर आला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये सोन्याच्या मागणीत 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत माहिती जागतिक सुवर्ण परिषदेकडून (World Gold Council) समोर आली आहे. तर ऐनसनासुदीत सोन्याची मागणी वाढणार असल्याचंही जागतिक सुवर्ण परिषदेनं अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या महामारीत सोन्याची मागणी (Gold Demand) कमी होती. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सराफा व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम जाणवला.
गतवर्षी जुलै-सप्टेंबर महिन्यात भारतातील सोन्याची मागणी 94.6 टन इतकी होती, त्या तुलनेत यंदा ती 139.1 टनांवर पोहचली आहे.
(59,330 कोटी रुपये) सोन्याच्या दागिन्यांची मागणी देखील 58 टक्क्यांनी वाढली आहे.
म्हणजेच दागिन्यांसाठी सोने (Gold ) आयात 60 टनांवरुन 96.2 टनांवर पोहचली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान सोन्याची मागणी (Gold) 37 टक्के वाढली असून 59,330 कोटी रुपये झाली. जी गतवर्षी 43, 160 कोटी रुपये होती.
जागतिक सुवर्ण परिषदेचे (World Gold Council) प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी इंडिया सोमसुंदर (CEO Somasunder) म्हणाले, सोन्याच्या मागणीवर बेस इफेक्टबरोबरटच पॉझिटिव्ह ट्रेंड आणि कंज्युमर सेंटीमेंटचा परिणाम दिसत आहे. सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण.
लसीकरणामुळे कोरोनाच्या संख्येत झाली आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. तरी चौथ्या तिमाहीत सोन्याची आयात जास्त होणार नाही.
कारण सोनार सणासुदीसाठी सोन्याचा स्टॉक आधी तयार करतात. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असून सर्व पूर्वपदावर येत आहे.
त्यामुळे सोन्याची मागणीही पूर्वीप्रमाणे आहे. सोन्याच्या मागणीत अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे सण आणि लग्नसराई.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

डिजीटल गोल्डच्या मागणीत वाढ –

डिजीटल गोल्डच्या मागणीतही अनेक पटीने वाढ झाली. अनेक ज्वेलरीच्या कंपन्यांनी विक्री वाढवण्यासाठी डिजीटल गोल्ड आणि यूपीआय शी करार केला आहे.
कमोडिटी प्राईस आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्ये अचानक आलेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
तसेच, मूल्याच्या दृष्टीने सोन्यातील गुंतवणुकीवर नजर टाकली तर जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 15,410 कोटी रुपयांवरून 19 टक्क्यांनी अर्थात 18,300 कोटीवर पोहचले आहे.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये सोने चांदीच्या 187 टक्के वाढली असून 255.6 टनावर पोहचली आहे. असं रिपोर्टनुसार समोर आलं आहे.

Web Title : Gold Demand | gold demand rises 47 in july september says world gold council

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘…पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही’ (व्हिडीओ)

Bhandara Crime | दुर्देवी ! 2 चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू

Breast Cancer | पुरुषांमध्येही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची समस्या निर्माण होऊ शकते; काय आहेत लक्षणे?, जाणून घ्या

Related Posts