IMPIMP

Gold Price | दिवाळीत सोने होऊ शकते स्वस्त, डॉलरचा सोन्यावर दबाव

by nagesh
Gold Silver Prices | Today's Gold Silver Prices In India

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भारतात सणासुदीमध्ये सोने-चांदीची (Gold Price) मागणी वाढते. शिवाय, भाव देखील वाढतात. या दिवाळीला मात्र सोने स्वस्त होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी मिळू शकते. सध्या अमेरिकन बाजारपेठेत मंदीचे सावट असून व्याजदर वाढल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहे. दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये सोन-चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्याने भारतातही सोन्याचे दर (Gold Price) घसरण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कॉमेक्सवर मंगळवारी सोन्याचा दर प्रति औंस 1670 डॉलरच्या खाली आला. चांदीच्या दरातही अर्धा टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारांवर होऊ शकतो, आणि सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. दिवाळीपूर्वी सोन्याचा दर प्रति तोळा 50 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. डॉलरचे मूल्य वाढल्याने सोन्यावर दबाव आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर कमी झाला आहे.

कॉमेक्सवर या महिन्यात सोन्याचा भाव (Gold Price) 1730 डॉलर प्रति औंस वरून 1670 यूएस डॉलर प्रति औंस झाला. 60 ने किंमती घसरल्या आहेत, तर आगामी काळात आणखी किंमती खाली उतरण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष्य अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि महागाईवर आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबत आशियातील मार्केटवरही झाला आहे. त्यामुळे सोन्यावरचा दबाव वाढला आहे. रशिया युक्रेन युद्धाचाही मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या दरात घसरण होण्याचे प्रमुख कारण अमेरिकेतील वाढलेले व्याजदर आहे.
अहवालानुसार डिसेंबरपर्यंत यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा व्याजदरात दोनदा 0.75 टक्क्यांनी वाढ करू शकते.

सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल दिवाळीपर्यंत कायम राहील.
देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 50 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत येऊ शकते असा दावा,
केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gold Price | gold price may be down in diwali know why 2022

हे देखील वाचा :

Shinde Group | पहिले पर्याय रद्द झाल्याने शिंदे गटाने पुन्हा पाठवली ही 3 चिन्ह, निवडणूक आयोगाला अखेरच्या क्षणी केला ई-मेल

Pune Crime | मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; एका तरुणावर FIR

Pune Crime | सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिक गेला घर सोडून; सावकारावर FIR

Related Posts