IMPIMP

Gold Price | दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करुन ठेवा, दिवाळीनंतर सोने महागणार!

by nagesh
Gold Price | gold prices likely to rise ahead

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (Diwali Festival) सोने खरदेसाठी लोकांची लगबग सुरु झाली आहे. झवेरी बाजारासह मुंबई शहर आणि उपनगरातील सराफांच्या दुकानांत सोने 52 हजार रुपये प्रति तोळा रुपयांच्या आसपास (Gold Price) आहे. मात्र, दिवाळीनंतर सोन्याचा भाव 53 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता सराफा बाजाराने (Bullion Market) व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सोने महागणार (Gold Price) असल्याने दिवाळीदरम्यान सोन्याची खरेदी-विक्रीने जोर पकडल्याचे पहायला मिळत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोन्याची बुकिंग केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कानातले आणि बांगड्या यांचा समावेश आहे. दिवाळीला सोन्याची खरेदी (Gold Price) ही शुभ मानली जाते. यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमणात सोने खरेदी केले जात असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे (Mumbai Jewelers Association) अध्यक्ष कुमार जैन (Kumar Jain) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोन्याच्या दरातील चढ-उतार

– दिवाळी दरम्यान सोन्याचा भाव प्रतितोळा 52 हजार रुपयांच्या आसपास आहे.
– दिवाळीपूर्वी हा 53 हजारांच्या आसपास होता. त्यापूर्वी सोन्याचा भाव 55 हजारांवर होता.
– मागील दोन वर्षात सोन्याचे भाव 48 हजारांपासून 55 हजारांदरम्यान वर खाली होत आहेत.
– मागील काही दिवसांपासून सोन्याचा दर 52 हजारांवर स्थिर आहे.
– दिवाळीत सोन्याची नाणी खरेदी करण्यावर भर
– गेल्यावर्षी देशभरात 80 टन सोन्याच्या खरेदी-विक्रिचे व्यवहार झाले. यांदा 120 टन होण्याची शक्यता

सोने कोठून येते?

सरकार जे सोने आयात करते ते सोने झवेरी बाजारात येते. मग येथील होलसेल व्यापारी सोने बँक, सरकारकडून खरेदी करते. सोने आयात होते. तेथून सोन्याचे वितरण होते.

Web Title :- Gold Price | gold prices likely to rise ahead

हे देखील वाचा :

Railway Accident | बडनेराजवळ मालगाडीचे १९ डब्बे लोहमार्गावरुन घसरले; दिवाळीला घरी पोहचणारे प्रवासी वाटेत लटकले, ४ गाड्या रद्द, २६ गाड्या वळविल्या

Ind Vs Pak T20 World Cup | ‘विराट’च्या बाजीगर खेळीने अनेक बुकी ‘बरबाद’ ! ‘पाकिस्तान’चा संघच नव्हे तर ‘बुकी’ही हारले, ‘टीम इंडिया’समर्थक झाले ‘मालामाल’

Pune Accident News | दुर्दैवी ! कचरा वाहतूक करणार्‍या कंटेनरची दुचाकीला धडक; सॅलसबरी पार्कमधील महिलेचा जागेवरच मृत्यू

Related Posts