IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Prices | gold silver rate today 22 and 24 karat gold price today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 14 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) जबरदस्त तेजीचा कल होता. यामुळे सोने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचले. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज मोठी उसळी नोंदली गेली आणि ती 62 हजार रुपये प्रति कि.ग्रॅ.च्या जवळ पोहचली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर, चांदी 61,032 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात उसळी आली.
तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या दरात 455 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी तेजी नोंदली गेली.
यामुळे दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचला.
आज दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली आणि तो 1,795 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज ताबडतोब वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदी 894 रुपयांच्या तेजीसह 61,926 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 23.20 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, कमजोर डॉलर आणि अमेरिकन बाँड यील्डमधील घसरणीमुळे सोने उच्च किमतीवर व्यवहार करत आहे. तसेच, महागाईच्या चिंतेने सुद्धा सोन्यात तेजी नोंदली गेली आहे. (Gold Price Today)

Web Title : Gold Price Today | gold price today rallies and reached to 47k per 10 gram and silver price also jumped check update prices

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 103 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MHADA Lottery 2021 | म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर ! म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारी ठरली आजच्या सोडतीत विजेती

Pune Crime | IT इंजिनिअर महिलेला Tinder Dating App वरील ओळख पडली महागात; लग्नाच्याआमिषाने 73 लाखांचा गंडा

Related Posts