Gold Price Weekly | आठवड्यात सोने झाले 1400/- ने जास्त महाग, जाणून घ्या आता किती आहे 10 ग्रॅमचा दर
नवी दिल्ली : Gold Price Weekly | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या साप्ताहिक किमतीत तेजी आली आहे. तर चांदी महागली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेए (IBJA) च्या वेबसाईटनुसार, या व्यवहाराच्या आठवड्याच्या प्रारंभी १८ जूनला २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ७१,२८५ होता, जो २१ जूनपर्यंत वाढून ७२,७४६ रुपये प्रती १० ग्रॅम झाला आहे. तर, ९९९ शुद्धतेची चांदी (Silver) ८७,५५३ वरून वाढून ९०,६६६ रुपये प्रती किलोग्रॅम झाली आहे.
आयबीजेएकडून जारी हे दर टॅक्स आणि मेकिंग चार्जच्या पूर्वीचे आहेत. हे दर देशभरात सर्वमान्य आहेत, परंतु या किमतीत जीएसटीचा समावेश नाही.
मागी आठवड्यात किती बदलला सोन्याचा दर
१७ जून, २०२४- बाजार बंद
१८ जून, २०२४- ७१,२८५ रुपये प्रती १० ग्रॅम
१९ जून, २०२४- ७१,७०४ रुपये प्रती १० ग्रॅम
२० जून, २०२४- ७२,१६२ रुपये प्रती १० ग्रॅम
२१ जून, २०२४- ७२,७४६ रुपये प्रती १० ग्रॅम
मागील आठवड्यात किती बदलला चांदीचा दर
१७ जून, २०२४- बाजार बंद
१८ जून, २०२४- ८७,५५३ रुपये प्रती किलोग्रॅम
१९ जून, २०२४- ८८,१९५ रुपये प्रती किलोग्रॅम
२० जून, २०२४- ९०,०३८ रुपये प्रती किलोग्रॅम
२१ जून, २०२४- ९०,६६६ रुपये प्रती किलोग्रॅम
Comments are closed.