IMPIMP

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price 13th may 2022 gold price in delhi gold price drops by rs 1500 find out the latest rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे.
या दिवसांत आता सोनं स्वस्त मिळत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver
Price Today) मोठी घसरण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात सोन्याचा भाव (Gold Price) 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. तसेच,
मागील तीन महिन्याचा विचार करता सध्या सोने आपल्या निच्चांकी पातळीवर असल्याचे दिसते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज (शुक्रवारी) सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा दर 0.03 टक्क्यांनी घसरून 50,158 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला. तर नंतर लगेच सोन्याचा दर 0.07 टक्क्यांनी कमी झाला होता. विशेष म्हणजे, सकाळच्या सुमारास, बाजार सुरू
झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली होती, मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today)

आज जागतिक बाजारात सोने 0.1 टक्यांच्या घसरणीसह 1,820.54 डॉलर प्रती औंसवर ट्रेड करत आहे.

तसेच, चांदीची स्पॉट किंमत 0.5 टक्क्यांनी घसरून 20.76 डॉलर प्रति औंसवर आली आहे. या दरम्यान, आज चांदीच्या किमतीने उसळी घेतल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) चांदीचा भाव (Silver Price) 0.3 टक्क्यांच्या उसळीसह 58,920 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. परंतु, त्यानंतर चांदीचा भाव 359 रुपयांनी वाढून 59,110 रुपयांवर पोहोचला आहे.

Web Title :-  Gold Silver Price Today | gold silver price 13th may 2022 gold price in delhi gold price drops by rs 1500 find out the latest rates

हे देखील वाचा :

Aatpadi Nights | ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक नितीन सुपेकर घेऊन येत आहेत ‘सरला एक कोटी’

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन लुबाडले; 2 लाखांची खंडणी मागून रात्रभर ठेवले डांबून

NCP Leader Nawab Malik | नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Related Posts