IMPIMP

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
 Import Duty on Gold | import duty on gold raises as well export taxes for diesel petrol atf increases to save rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सराफा बाजारात कमी होताना दिसल्या. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,320 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये प्रति किलो आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) घट होताना पाहायला मिळालं. परंतु, आता दरात साधारण वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमीच आहे. गेले काही महिने सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत असल्याने ग्राहकांचाही खरेदीसाठी कल दिसून आला. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असतो.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46.130 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,390 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47.320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48.320 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47.320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48.320 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62.000 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 29 november 2021

हे देखील वाचा :

Nora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता कट, पाहून चाहते भडकले (व्हिडीओ)

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

Related Posts