IMPIMP

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच’

by nagesh
Gopichand Padalkar | bjp gopichand padalkar slams shivsena sanjay raut over ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना ईडीने (ED) चौकशी करुन रविवारी रात्री अटक (Arrest) केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली. यानंतर आता भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) असताना त्यांनी अनेक खोट्या केसेस दाखल केल्या. आपल्याला अनेक प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण पुरावेच नसल्याने त्यात न्यायालयाने जामीनही दिला. तुम्ही दाखल केलेल्या केसेस, प्रकरणात आम्ही आजही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहोत. पण आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही तो मी नव्हेच, असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ते पुढे म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेला (Judicial Process) सामोरे जा, तुमच्याकडील पुरावे द्या.
तिथं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, चुकीचं काही केलं नसेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही, असं देखील गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.
ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

Web Title : –  Gopichand Padalkar | bjp gopichand padalkar slams shivsena sanjay raut over ed

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

EPFO | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! ईपीएफओने सुरू केली नवीन सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सर्वाधिक लाभ

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले

Stock Market Holidays | ‘या’ महिन्यात NSE, BSE किती दिवस बंद राहणार, चेक करा पूर्ण लिस्ट

Related Posts