IMPIMP

Gopichand Padalkar On Jayant Patil | ‘जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक’ – गोपीचंद पडळकर

by nagesh
Gopichand Padalkar | discussion in islampur on gopichand padalkar statement about jayant patil joining bjp

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Gopichand Padalkar On Jayant Patil | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते
जंयत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचे सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर आजही
दिसून येतंय. सत्ता नसेल तर जयंत पाटील काम करू शकत नाहीत. आता शरद पवार (Sharad Pawar) कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून
जातो अशी जयंत पाटलांच्या मनात घालमेल सुरूय,’ असं पडळकर यांनी म्हटलं आहे. (Gopichand Padalkar On Jayant Patil)

सांगलीतील (Sangli News) वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (Krantiveer Nagnathanna Nayakwadi) यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात आमदार पडळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“विधान परिषदेचा एकीकडे निकाल लागला आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतला गेले. काही दिवसातच महविकास आघाडीची सत्ताही गेली. तेव्हापासून जयंत पाटील यांचा चेहरा सुतक असल्यासारखा झालाय. इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का?,” असा सवाल पडळकर यांनी उपस्थितांना केला. ‘आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही.’ असही पडळकर म्हणाले.

“सांगली जिल्हा बँकेत प्रचंड भ्रष्टाचार झालाय. नोकर भरतीतही प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे.
त्यामुळे बँकेवर प्रशासक लावायची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे,” पडळकर म्हणाले.
शिंदे सरकारचा अजून विस्तार झाला नाही या टीकेचाही पडळकर यांनी समाचार घेतला.
‘आज उद्या होईल ना सरकारचा विस्तार. हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही.
शिंदे आणि फडणवीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघे भारी आहेत,’ असं देखील पडळकर यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Gopichand Padalkar On Jayant Patil | bjp leader gopichand padalkar on ncp leader jayant patil at sangli

हे देखील वाचा :

Supreme Court On Rape Case | ‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही – सुप्रीम कोर्ट

Maharashtra Rains Update | राज्यात सर्वत्र ‘धो-धो’; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

Poona Hospital And Research Centre | पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळाकडून आयोजित रक्तदान शिबीरात 97 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Related Posts