IMPIMP

Gopichand Padalkar On Uddhav Thackeray | गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, लिहीलं – ‘अहमदनगरचे नाव बदलून…’

by nagesh
Gopichand Padalkar On Thackeray Government | mahavikas aghadi conspiracy to deprive obc of political representation allegation of bjp leader gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gopichand Padalkar On Uddhav Thackeray | औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलून संभाजीनगर (Sambhajinagar) करा, अशा मागण्या होत असतानाच आता अहमदनगरचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. ‘अहमदनगरचं (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (Ahilya Nagar) करा,’ अशी मागणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलं आहे. नामांतरासंदर्भात पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही (NCP Chief Sharad Pawar) निशाणा साधला आहे. (Gopichand Padalkar On Uddhav Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो,” असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

“हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, त्याचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे,” असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, “आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा?
‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून
स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, नाहितर हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय,
हे लक्षात ठेवा,” असंही पडळकर म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gopichand Padalkar On Uddhav Thackeray | ahmednagar name changing as ahilya nagar gopichand padalkar letter to cm uddhav thackeray

हे देखील वाचा :

Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | महाराष्ट्रात आता दारूची होम डिलिव्हरी बंद; अजित पवारांनी दिली माहिती

Johnny Depp-Amber Heard | अभिनेता जॉनी डेपच्या बाजूने न्यायालयाचा निकाल; एम्बर हर्डला द्यावी लागणार तब्बल 116 कोटींची नुकसान भरपाई

Symptoms Of Cervical | तुम्हाला सर्वाइकल झाला आहे का?; जाणून घ्या काय आहेत लक्षणे

Related Posts