IMPIMP

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

by pranjalishirish
government selling 35 thousand acres of jagannath temple iskcon spokesperson said result of apathy of foolish hindus

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – ओडिशा सरकार भगवान जगन्नाथच्या Jagannath नावाने पसरलेली 35000 एकर जमीन राज्य आणि देशाच्या इतर भागात विकत आहे. 12 व्या शतकाच्या मंदिराचा 650 कोटींचा निधी 2023 पर्यंत वाढवून 1000 कोटी रुपयांवर पोहचविणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. विधानसभेत भाजपचे आमदार मोहन लाल मांझी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा व गृहनिर्माण व नगरविकास मंत्री प्रताप जेना म्हणाले की, माजी राज्यपाल बी.डी. शर्मा आणि जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने हे हाती घेतले. 35,272.235 एकर जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात इस्कॉनचे प्रवक्ते म्हणाले की, हा मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम आहे.

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

याबाबत जेना म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत श्री जगन्नाथ मंदिराशी संबंधित 60,4226.943 एकर जमीन शोधली आहे. त्यापैकी 395.252 एकर ओडिशाच्या बाहेर बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यामध्ये आहे. जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि जमीन नोंदी नियमित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

अनेकांनी देवाला दान केली जमीन :

जगन्नाथ मंदिर अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, बर्‍याच भाविकांनी शेवटच्या इच्छेनुसार देवाच्या नावाने जमीन दान केली होती. परंतु गेल्या अनेक वर्षांत अनेक भागात अशा प्रकारच्या जागेवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. भगवान जगन्नाथच्या  Jagannath नावाची जमीन ओडिशाच्या 2 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे, तर इतर सहा राज्यात 395.252 एकर जमीन सापडली आहे.

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

कुठे कुठे आहे पहा देवाच्या नावाची जमीन :

जगन्नाथ मंदिराच्या अधिकृत नोंदीनुसार 17.02 एकर आंध्र प्रदेशात, तर 322.93 एकर बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात 28.218 एकर आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 25.11 एकर, बिहारमध्ये 0.274 एकर आणि छत्तीसगडमध्ये 1.700 एकर आहे. ही जमीन परत मिळविण्यासाठी आम्ही संबंधित जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत. जमीन विकली जाईल आणि त्यातून मिळवलेली रक्कम भगवानच्या जगन्नाथ यांच्या नावावर एका निश्चित ठेवली जाईल. मंदिराच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, 2023 पर्यंत देवाच्या नावाने आम्ही 1,000 कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्याचा आमची प्लॅन आहे.

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

असा असणार खरेदी विक्रीचा प्लॅन :

भगवान जगन्नाथ यांच्या नावावर 30 वर्षे, 20 वर्षे आणि 12 वर्षांच्या नावावर असलेली जमीन ताब्यात घेणार्‍यांना अनुक्रमे 6 लाख, 9 लाख आणि 15 लाख रुपये देऊन स्वत: च्या नावावर नोंदणी करण्याची संधी मिळेल. दरम्यान, श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पुरी राजा, गजपती दिव्यसिंग देब यांनी अनिवासी ओडिसांशी बोलून मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य मागितले आहे. अंदाजे 3,000 कोटी रुपयांच्या खर्चाने ओडिशा सरकार पुरीचे जागतिक वारसा शहरात रूपांतर करण्याचे काम करीत आहे.

Also Read : 

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts