IMPIMP

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा

by nagesh
Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Governor Bhagat Singh Koshyari | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16
आमदारांना काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये सत्तापेच कायम आहे.
अशा सत्तासंघर्षात आघाडी सरकारकडून 3 दिवसांमध्ये 160 शासन निर्णय (GR) काढण्यात आले आहे. कमी दिवसात इतके जलद जीआर काढल्याने
आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी जीआर बाबत माहिती मागवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 22, 23 आणि 24 जून दरम्यान राज्यातील आघाडी सरकारने जवळापास 160 जीआर काढल्याचे समोर आले आहे. यानंतर 3 दिवसांत तब्बल 160 जीआर काढल्यामुळे भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आक्षेप घेतला होता. दरेकर यांनी याबाबतचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांना पाठवले होते.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी आता या पत्राची दखल घेतली आहे. दरेकरांच्या पत्रांवर कारवाई करत राज्यपालांनी राज्य सरकारकडून जीआरबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबतचे पत्र राज्यपालांनी मुख्य सचिवांना (Chief Secretary) पाठवले आहे. 22,23 आणि 24 जून दरम्यान घेतलेल्या निर्णयाबाबत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | only in three days thackeray mahavikas aghadi government issue 160 gr governor bhagat singh kishori asks for disclosure to government

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

Mumbai Building Collapse | मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 9 जण रुग्णालयात

Shivsena MP Sanjay Raut | “चालते फिरते मुडदे…” म्हणत संजय राऊतांचं नवं ट्वीट

Related Posts