IMPIMP

Gujarat Election 2022 | नवसारी येथे भाजप उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला

by nagesh
Gujarat Election 2022 | gujarat election 2022 attack on bjp candidate piyush patel before polling

नवसारी : वृत्तसंस्था – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार, दि. 1 डिसेंबर) मतदान होत
आहे. सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या टप्प्यात 788 उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, या मतदानाच्या अगोदर नवसारी जिल्ह्यातील वासंदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष पटेल (Gujarat Election 2022) यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सदर हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पीयूष पटेल हे वासंदा मतदारसंघातील झरी गावात गेले होते. भाजपने काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. वासंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पीयूष पटेल समर्थकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वासंदा गुजरातमधील नवसारी जिल्ह्याचा भाग आहे, तसेच हा प्रभाग अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी आरक्षित आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत (2009) भाजपने या टप्प्यातील 89 पैकी 48 जागा जिंकल्या होत्या.
काँग्रेस 40 जागांवर होती, तर एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता. या भागात सर्व 89 जागांवर भाजप आणि काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत, तर आपने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि भारतीय ट्रायबल पार्टीसह इतर अनेक राजकीय पक्ष या विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण 4 कोटी 91 लाख 35 हजार 400 मतदारांपैकी 2 कोटी 39 लाख 76 हजार 760 मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gujarat Election 2022 | gujarat election 2022 attack on bjp candidate piyush patel before polling

हे देखील वाचा :

Pune Traffic Police – PMC Water Supply | ‘जड वाहतूक’ या शिर्षकाखाली वाहतूक पोलिसांची ‘पाण्याच्या टँकर्स’वर कारवाई ! पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने उपनगरातील नागरिकांकडून संताप व्यक्त

Navneet Ravi Rana | हनुमान चालिसा वादाप्रकरणी राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने जारी केले वॉरंट

Pune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण

Related Posts