IMPIMP

Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | ‘सागर सॉल्ट’ची भिंत कोसळून मोठी दुर्घटना; 12 मजुरांचा मृत्यू

by Team Deccan Express
Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | gujarat accident at least 12 people died after a wall of a sagar salt factory in morbis halvad gidc collapsed

अहमदाबाद : वृत्तसंस्था – Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | गुजरात (Gujarat) येथील मोरबी कंपनीमध्ये (Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse) मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीची एक भिंत कोसळल्याने तब्बल 12 मजुरांचा मृत्यू (Death of 12 Laborers) झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, या घटनेमध्ये अनेक लोक गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त असल्याने या घटनेमध्ये मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरातमधील या मोठ्या दुर्घटनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मोरबी जिल्ह्यातील हलवड येथील सागर सॉल्ट नावाच्या कंपनीतील (Sagar Salt Company) भिंत कोसळल्याने सुमारे 30 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. येथील जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या घटनेमध्ये अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे.
”मोरबीमध्ये भिंत कोसळून झालेली शोकांतिका हृदय हेलावणारी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत.
जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.” असं ट्विट मोदींनी केलं आहे.

Web Title :- Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | gujarat accident at least 12 people died after a wall of a sagar salt factory in morbis halvad gidc collapsed

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts