IMPIMP

Gulabrao Patil | मी दादा कोंडकेंचे चित्रपट बघतो त्यामुळे द्वीअर्थी बोलणारच – गुलाबराव पाटील

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patil gets angry and slams opposition in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन   जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज (दि.01 नोव्हें) जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात भाषण दिले. यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोले लावले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मी गावराण माणूस आहे. मी दादा कोंडकेंचे (Dada Kondke) चित्रपट पाहणारा माणूस आहे. त्यामुळे मी द्वीअर्थी बोलतो. मी जर का मुके मुके बोललो, तर ते ब्राम्हणाने मंत्र म्हणाल्याप्रमाणे होईल. माणूस चार अर्थांनी बोलतो. पण लोक त्यातील एकच अर्थ काढतात. मी जर किर्तनकार असोत, तर आज इथे जेवढी गर्दी आहे, त्याच्या पाचपट गर्दी असती. मी योगायोगाने या धंद्यात आलो. आणि तुमच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आपला हा धंदा देखील उत्तम सुरु आहे, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सर्वांसाठी निर्णय घेणारा मुख्यमंत्री झाला आहे. मात्र, आमची नावे अलीबाबा आणि चाळीस चोरांप्रमाणे झाली आहेत. आमची राज्यात बदनामी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) हिंदुत्वासाठी आणि भगव्या झेंड्यासाठी, राज्याचे भले व्हावे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यावेळी म्हणाले.

ज्यावेळी पहिल्या फळीतील आमदार गुजरातला गेले, तेव्हा मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जाऊन भेटलो.
आम्ही 20 – 22 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना परत बोलविण्यसाठी उद्धव ठाकरेंना सांगितले.
पण त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी तुम्हाला जायचे असेल, तर तुम्ही पण जा, असे उत्तर त्यावेळी आम्हाला दिले.
कोणीही असेना, पण माणसाला राग येतो, असे यावेळी पाटील म्हणाले.

तसेच संजय राऊत एकदा म्हणाले होते की, हे दिसायला सिंहाप्रमाणे आहेत, पण मन उंदराप्रमाणे आहे.
त्यांना कल्पना नाही की, उंदीर एकदा घुसला, तर चांगल्या चांगल्यांना कुरतडतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil comment on his double meaning statements in speech

हे देखील वाचा :

Anil Parab | अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही 99% मतांनी जिंकू – अनिल परब

आता रोख पैसे जवळ ठेवायची गरज नाही! RBI ने केली Digital Rupee ची सुरुवात

Pune PMC News | ‘बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीचित्र लावल्यास एक हजार रुपये दंड, ‘फाईन’ न भरल्यास मिळकतींवर बोजा चढविणार’ – पुणे महापालिका

Related Posts