IMPIMP

Gulabrao Patil | मी एका महिन्यात तीन वेळा जिल्ह्यात येणारा पालकमंत्री आहे, बाकीचे सहा सहा महिने येत नाहीत – गुलाबराव पाटील

by nagesh
Gulabrao Patil | I am the guardian minister who comes to the district three times in a month, the rest of the six months do not come

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यावर अनेक महिने उलटून गेले, तरी देखील मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांनीच कारभार चालवला आहे. एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. त्यामुळे विविध जिल्ह्यातील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने केला होता. त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जिल्ह्यात बेपत्ता नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील पालकमंत्री शोधून द्यावेत,
अशी बुलढाणा पोलिसांत (Buldhana Police Station) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.
डॉ राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. पाटील बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले, मी बेपत्ता राहण्याचे कारणच नाही. माझा जिल्ह्यात हा तिसरा दौरा आहे. एका महिन्यात तीन वेळा मी जिल्ह्यात आलो आहे. शिंगणे सहा सहा महिने बैठका घेत नाहीत. त्यामुळे तेच कुठे बेपत्ता होते, याचे उत्तर त्यांनी पहिले द्यावे.

Web Title :- Gulabrao Patil | I am the guardian minister who comes to the district three times in a month, the rest of the six months do not come

हे देखील वाचा :

Hostel Daze | दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या शेवटच्या सीरिजचा ट्रेलर रिलीज

Ajit Pawar | “काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या… “; अजित पवारांचे स्पष्टीकरण

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Related Posts