IMPIMP

Gulabrao Patil | ‘… तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती’, गुलाबराव पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patil gets angry and slams opposition in jalgaon

मुंबई  : सरकारसत्ता ऑनलाईन   आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी (NCP) भाजपसोबत (BJP) गेली असती असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला. आमचे सरकार मजबूत असून उरलेले दोन वर्षे हे सरकार पूर्ण करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले असून त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी असल्याचे विधान केले होते. यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, यापूर्वीच हा प्रयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे सरकारने (Shide Government) जर हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांना टोला लगावताना म्हटले होते की, पक्ष सोडणे गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली.
त्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, आम्ही पक्ष कुठे सोडला आहे, आम्ही मूळ शिवसेना (Shivsena) आहोत,
बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे, आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना
(Balasaheb’s shiv Sena) आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्ह मिळाले आहे.
आम्ही पक्षांतर केलेले नाही, जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Gulabrao Patil | if the ncp would have gone with the bjp gulabrao patil reaction on ncp and bjp alliance

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांना धक्का, ईडीला मिळाली वांद्रे, कुर्ला आणि उस्मानाबाद येथील संपत्ती जप्त करण्याची परवानगी

T20 World Cup 2022 | वर्ल्ड कपमध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई करणाऱ्या बॅट्समनला विराट कोहलीने दिले ‘हे’ खास गिफ्ट

Indian Society of Digital Dentistry | प्रगत दंतवैद्यक उपचार लोकाभिमुख करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीची स्थापना

Related Posts