IMPIMP

Gulabrao Patil | भोसरी भूखंड प्रकरणावर गुलाबराव पाटलांनी खडसेंना डिवचलं, म्हणाले-‘… म्हणून हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले’

by nagesh
Gulabrao Patil | minister gulabrao patil criticizes ncp leader eknath khadse

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात (Bhosari Plot Purchase Case) पुणे सत्र न्यायालयाने (Pune Session Court) फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. या कथित भूखंड खरेदीसोबत राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव जोडले गेले आहे. त्यामुळे ते सध्या प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या या प्रकरणावर शिंदे समर्थक आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केले आहे. खडसे यात निर्दोष असतील, तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

भोसरी भूखंड प्रकरण फार जुने आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई देखील तुरुंगात आहेत. आता हे प्रकरण राज्य सरकारने (State Government) बाहेर काढले नाही, तर तपास यंत्रणांनी बाहेर काढले आहे. त्यांना पुन्हा या प्रकरणात तपास करायचा असल्याने त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले आहे. एकनाथ खडसे यांना या प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. आणि जर का ते या प्रकरणात निर्दोष असतील, तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे आमदार नाराज आहेत.
त्यामुळे त्यांच्यापैकी काही फुटून भाजपमध्ये (BJP) जाणार असा दावा शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) यांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनात याबाबत वृत्त छापून आले आहे. त्यावर देखील गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.
सामना हे वर्तमानपत्र कोणाचे आहे, हे सर्वांना माहीत आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्यांचे हे वक्तव्य आहे, असे पाटील म्हणाले.

भोसरी भूखंड प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात आपला छळ केला जात आहे, असे खडसे म्हणाले.

Web Title :- Gulabrao Patil | minister gulabrao patil criticizes ncp leader eknath khadse

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे ‘एका दगडात दोन पक्षी’, गडचिरोलीत नक्षलवाद्यांना इशारा देताना उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा

Devendra Fadanvis | दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

Related Posts