IMPIMP

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

by nagesh
Gulabrao Patil | instead of torturing us by saying the same thing build a new party gulabrao patil s reaction to aditya thackerays claim regarding eknath shinde revolt

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन   Gulabrao Patil On Aditya Thackeray | शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती. असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. (Gulabrao Patil On Aditya Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पाटील सध्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटाच्या आगामी सभांचा आढावा घेतला. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बिहार दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यांनी तिकडे जाण्यापूर्वी ते जर का महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यांना तिकडे जाण्याची गरज पडली नसती. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी सिन्नर दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे भविष्य पाहिले, असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर पाटील म्हणाले, मुख्यमंत्री स्वतः कर्तुत्वान असून, त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकारांचे भविष्य पाहतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितले म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते.

कर्नाटक राज्याने महाराष्ट्रातील सांगलीच्या जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. त्यावर देखील गुलाबराव पाटीलांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतीचा साधा प्रभाग सुद्धा आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील आहे, असे ते म्हणाले. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, दोनही नेत्यांनी संयम ठेवावा. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, दोन्ही नेत्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे. (Gulabrao Patil On Aditya Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून, हा या पक्षात जाईल तो त्या पक्षात जाईल, असे आरोप करत आहेत.
त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
निवडणुका ही प्रशासकीय बाब असून, याचा कोणी काही अर्थ काढू नये, असे यावेळी पाटील म्हणाले.

Web Title :- Gulabrao Patil On Aditya Thackeray | Gulabrao Patil On Aditya Thackeray Visit Bihar

हे देखील वाचा :

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

Vikram Gokhale | विक्रम गोखले व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाकडून माहिती

Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

Related Posts